नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
"""""""""""लाल्या""""""""""""
बळीराजाचे विघ्न भाऊ
काही केल्या टळत नाही..
कपाशी कितीही सुंदर असेल
तरी लाल्या गेल्याशिवाय
ती मात्र राहत नाही....! ||1||
निसर्ग सुद्धा बघतो आहे
आता बळिराजाची मजा ..
का देवा तु आता देत आहे
गरीब बळीराजाला सजा....! ||2||
डोईझड झाला आहे आता
माझा खरचं कर्जाचा डोंगर..
तो आता हलका होत नाही
मी कितीही दाबला तरी नांगर...! ||3||
बळीराजाचा वाली कोणी नाही
ईश्वरावर भरवसा होता..
तो ही आता बळीराज्या कडे
ढुंकुनही आता पाहत नाही...! ||4||
- महेन्द्र माहोरे
शिवणगांव ता.तिवसा
जि.अमरावती
-------------------------