नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
च्यायला बुडवा हा सहकार
सहकाराचे नाव हे सालस
कामधेनूचे रूप ते गोंडस
पुढार्यांना देई धारा
शेतकर्यांना झाडी लाथा
आता कळलं विकासाला तर अडवा हा सहकार
च्यायला बुडवा हा सहकार, गड्यांनो बुडवा असा सहकार
गिळल्या गिरण्या, गिळले संघ
कारखान्यांची हालत तंग
बॅंका यांनी केल्या जर्जर
शिक्षण धंद्यावरती नजर
लुटालूट सुरू चोहीकडे, केला शेतकरी बेजार
च्यायला बुडवा हा सहकार, गड्यांनो बुडवा असा सहकार
तीन पिढ्या इथे यांचीच सत्ता
हजारो कोटीची मालमत्ता
कारखाने आणि शिक्षणसंस्था
मतपेटीची झाली व्यवस्था
फ़ौज चमच्यांची लाचार, गर्जे यांचा जयजयकार
च्यायला बुडवा हा सहकार, गड्यांनो बुडवा असा सहकार
लई आशेने ऊस लाविला
तळहाती फ़ोडापरी जपला
’पट्ट्या’ वरती कसा तरी घातला
आता पेमेंटसाठी जीव टांगला
दीड वर्षाने साखरेवर ठरतो, टिपर्याचा बाजार
च्यायला बुडवा हा सहकार, गड्यांनो बुडवा असा सहकार
सहकाराचा मंत्र हा निर्मळ
सम्राटांनी फ़ासला हरताळ
कामगार किसान करुनी निर्धन
मिळवली सत्ता भरीले रांजन
खुली व्यवस्था पाडून पदरी, रोकू ही लुटमार
च्यायला बुडवा हा सहकार, गड्यांनो बुडवा असा सहकार
- अनिल घनवट
------------------------------------------------------
प्रतिक्रिया
विररसातील शेतकरी गीत
विररसातील शेतकरी गीत आवडले.
या सहकाराने सारे वाटोळे केले. बुडवायलाच हवा.
शेतकरी तितुका एक एक!
पाने