Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

शेतकरी पुत्रांचा स्वाभिमान

Main page content

पंकज गायकवाड
By पंकज गायकवाड | 9:09 PM IST, शनी September 30, 2017
गद्यलेखन स्पर्धा-२०१७
वैचारिक लेख

शनिवार २२ जुलै २०१७ दुपारची वेळ होती. कामानिमित्त वाघोलीला गेलो होतो. अचानक धुवांधार पाऊस सुरू झाला म्हणून आडोसा घ्यायला दुचाकी रस्त्याच्या बाजूला लावून एक छोट्या हॉटेलात थांबलो. पाऊस लवकर उघडण्याची चिन्हे दिसत नव्हती म्हणून तिथेच एक चहा घ्यायचं ठरवलं. बाजूला आचारी गरम गरम कांदाभजी तळत होता. छान वातावरण तयार झालं होतं.

माज्याच बाजूला एक मजुराचं कुटुंब आडोशाला आलं, आई वडील व त्यांच्यासोबत अनुक्रमे अंदाजे ८ आणि ५ वर्षांचा मुलगा. आई वडील कसल्या तरी चिंतेत चर्चा करण्यात मग्न होते. दोन्ही मुले बराचवेळ खूप कुतूहलाने कांदाभजी कशी तयार केली जात आहे पाहत होते आणि मी त्यांच्याकडे पाहत होतो. माझा लहान भाचा जसा अशा गोष्टी आवडीने मागवून खातो अगदी तसंच काहीतरी मला त्यांच्या विषयी वाटलं. म्हणून ना राहवून मी त्यांना विचारलं की बाळा कांदाभजी खाणार का? मी देतो पैसे हॉटेलवाल्याला. पहिल्याच प्रश्नात ज्येष्ठ मुलगा नाही म्हणला.

मग मी विषयांतर करत मोठ्या मुलाला कुठून आला काय करतोस विचारलं. तेव्हा तो बोलू लागला की मी अकोल्याचा आहे आणि शाळेत तिसरीला जातो. त्याच्या सोबत बोलताना जाणवलं की ते कुटुंब अकोल्याहून सततच्या दुष्काळ आणि नापिकीमुळे गाव सोडून वाघोली येथे मजुरी करत आहे. मग मी परत एकदा त्याला सांगितलं की तू मागशील ते देणार मी खाण्यासाठी. तू सांग काय हवंय या हॉटेल मधून? त्याने परत उत्तर दिलं की नकोय मला काही आणि छोट्या भावाकडे बोट दाखवत म्हणला की याला विचारा काय पाहिजे. मी लहान भावाकडे पाहिलं तर तो आईला जाऊन बिलगला. मी परत विचारलं की अरे सांगा पटकन तुम्ही काय खाणार? तुम्ही मागाल ते देणार आज मी तुम्हाला!

मोठ्या मुलाने परत नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला की आम्ही आत्ताच घरून पोटभर जेवण करून निघालोय. त्यांचं उत्तर ऐकून खरंच मी भारावून गेलो आणि ठरवलं की नको आता यांचा स्वाभिमान दुखवायला. ८ वर्षे वय असलेला मुलगा किती समंजस आणि स्वाभिमानी आहे. किती विलक्षण गोष्ट आहे की त्याला त्याच्या परिस्थितीची याच वयात जाणीव आहे. काही झालं तरी कोणापुढे झुकायच नाही हात पसरायचे नाही हा गुण जणू काही त्याच्या रक्तातच आहे असं जाणवलं.

आपला देश हा भारत आणि इंडिया या दोन विचारसरणीमध्ये विभागला गेलाय. इंडिया मधील उद्योगधार्जिन सरकार आणि बेशिस्त प्रशासन विविध फसव्या योजनांच्या नावे शेतकऱ्यांचा पदोपदी अपमान करून त्यांना दुय्यम वागणूक देत असताना, ही अशी गुणवान मुले भविष्यात भारताचं नेतृत्व नक्कीच करतील. भारताचं भवितव्य उज्वल असल्याचं समाधान मला सुद्धा वाटलं.

जसा पाऊस बंद झाला तसा मी पटकन जायला निघालो आणि दुचाकीवर बसताना दोघांचा निरोप घेताना त्यांना स्मितहास्य केलं. माज्याकडे पाहून गोड हसत त्या दोघांनीही चटकन हात उंचावून मला निरोप दिला. त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव होते तेचं खरं समाधान होतं.

https://pankajsgaikwad.blogspot.in/2017/07/blog-post_26.html

#पंकज_गायकवाड
#माझी_लेखणी
#शेतकरी_पुत्रांचा_स्वाभिमान
पंकज गायकवाड
माझी लेखणी
शेतकरी पुत्रांचा स्वाभिमान
अनुभव

स्वाभिमान

Dhirajkumar Taksande

रवीवार, October 1, 2017 - 09:15
Permalink
New

छान अनुभव!

  • Log in or register to post comments
धन्यवाद सर

पंकज गायकवाड

सोमवार, October 2, 2017 - 00:37
Permalink
New

आपल्या सदिच्छा याच आम्हाला प्रेरणा देतात

पंकज गायकवाड
9595522852

  • Log in or register to post comments

In reply to स्वाभिमान by Dhirajkumar Taksande

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

शुक्रवार, October 13, 2017 - 12:04
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....! *congrats* :congrats:

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 6955 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 6 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    10 hours 27 minutes ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    10 hours 29 minutes ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    10 hours 31 minutes ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    10 hours 33 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    1 day 11 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - 2023-24 65
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 28
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 25
किती चाटणार भारतपुत्रा? 22
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 22
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 21
कापला रेशमाच्या सुताने गळा 19
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 18
आजचे शेतमालाचे बाजारभाव 8
किसान क्रांती 5
उठ शेतकऱ्या, घे मशाल 4
IT कार्यशाळा - लेखन कसे करावे? - भाग-१५ 4
उद्ध्वस्त 3
दुःखात राहतो मी 3
शेतक-यांचा राजा बळीराजा 3
मा. शरद जोशी यांना हार्दिक शुभेच्छा. 3
भूमी अधिग्रहण कायदा - २०१३ व २०१४ 3
नियोजन : ११ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, नाशिक 3
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२२ : निकाल 3
मरतात चार शेळ्या... 2

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 217,973
माझे फेसबूक स्टेटस-1 180,810
शुभारंभ 134,899
रानमेवा - भूमिका 109,382
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,376
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,136
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,529
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,773
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,573
उद्देश आणि भूमिका 77,432
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,405
विचारपूस 71,687
गणपतीची आरती ॥३५॥ 67,708
सत्कार समारंभ : वर्धा 66,719
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,265
किती चाटणार भारतपुत्रा? 61,222
जात्यावरची गाणी 55,988
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,361
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,034
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,337

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini