Main page content
लाचार बहुजनांना दिवाळी शुभेच्छांचा उपयोग काय?
स्वावलंबी vs लाचार बहुजन
लाचारीचे अनुवंशिक गुणसूत्रे बहुजनांच्या शरीरात इतके भिनले आहे की त्यांचे सर्व मार्ग आणि सर्व विचार लाचारीच्या रुळावरून जातात. लाचारांना कुणीतरी एक खंबीर आधार हवा असतो तो आधार त्यांना राजकीय नेता आणि राजकीय पक्ष यातून मिळतो. मग आधीच गुलाम असलेली बहुसंख्य जनता अधिक गुलाम होत जाते. गुलामांच्या गरजा पूर्ण होत नसल्याने त्यांचे अवलंबित्व आणखी विस्तारत जाते. अवलंबित्व विस्तारले की त्यांना मुक्तीचा मार्ग केवळ राजकीय प्रक्रियेतून दिसायला लागतो. त्यातूनच राजकारणापायी पिसाळण्याचा भयावह रोग लाचारांना जडायला लागतो.
स्वावलंबी माणूस स्वतःचा विचार करतो कारण त्याचा स्वतःवर विश्वास असतो आणि लाचार माणूस आपल्या आवडीच्या राजकीय नेत्याचा आणि राजकीय पक्षाचा विचार करतो. कारण नेता आणि पक्ष मजबूत झाला तर काहीतरी पदरात पडण्याची शक्यता तयार होण्याची शक्यता असते.
स्वावलंबी आणि लाचार आपापल्या कर्माने जगतात आणि कर्माची फळे भोगतात. त्यामध्ये इतरांच्या शुभेच्छांची काहीही भूमिका नसते.
दिवाळीच्या शुभेच्छा कोणाला द्याव्या? स्वावलंबी लोकांना शुभेच्छाची गरज नाही आणि लाचारांना शुभेच्छा देऊनही काही उपयोग नाही.
एकंदरीत काय तर दिवाळीच्या शुभेच्छा देणे म्हणजे आपल्या शुभेच्छा व्यर्थ खर्च करणे होय. :) :D :D
- गंगाधर मुटे
बळीराजावरील विनोदी लेखन
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
खाते बनवा आणि लॉगिन करा
| प्रकाशन दिनांक | लेख/कविता/गझलेचे शीर्षक | वाचनसंख्या | प्रतिसाद संख्या | साहित्य प्रकार | अंतिम अद्यतन |
|---|---|---|---|---|---|
| बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ | 26,316 | 4 | रानमेवा | 4 years 3 months | |
| पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ | 44,204 | 8 | रानमेवा | 4 years 3 months | |
| पराक्रमी असा मी | 17,245 | 1 | रानमेवा | 4 years 4 months | |
| भाषेच्या गमती-जमती : भाग-२ | 13,040 | 1 | माझे गद्य लेखन | 8 years | |
| भाषेच्या गमती-जमती : भाग-१ | 11,497 | 1 | माझे गद्य लेखन | 8 years | |
| पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका | 14,394 | 5 | नागपुरी तडका | 8 years | |
| मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! | 11,220 | 3 | माझी कविता | 9 years 8 months | |
| अशीही उत्तरे-भाग- १ | 21,864 | 3 | माझे गद्य लेखन | 10 years 4 months | |
| शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) | 9,110 | 2 | माझी मराठी गझल | 12 years | |
| उद्दामपणाचा कळस - हझल | 9,010 | 2 | माझी मराठी गझल | 12 years 8 months | |
| कापला रेशमाच्या सुताने गळा | 32,360 | 1 | माझी मराठी गझल | 12 years 8 months | |
| अशीही उत्तरे-भाग-३ | 17,273 | 1 | माझे गद्य लेखन | 13 years 7 months | |
| अशीही उत्तरे-भाग - २ | 15,254 | 1 | माझे गद्य लेखन | 13 years 7 months | |
| 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत | 4,642 | 0 | माझी कविता | ||
| राखेमधे लोळतो मी (हजल) | 7,976 | 0 | माझी मराठी गझल | ||
| मग हव्या कशाला सलवारी | 10,284 | 0 | रानमेवा | ||
| छातीचं झाकण बोम्लीवर आलं | 11,377 | 0 | रानमेवा | ||
| मांसाहार जिंदाबाद ...!! | 16,629 | 0 | रानमेवा | ||
| आंब्याच्या झाडाले वांगे | 11,439 | 0 | रानमेवा |
शोध
सदस्य प्रवेश
वाचकांच्या भेटी
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
Who's online उपस्थित सदस्य
Visitors Online/उपस्थित पाहुणे
- सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 88 *
Who's new नवीन सदस्य
Recent comments ताजे प्रतिसाद
- 3 minutes ago
- 3 hours 47 minutes ago
- 3 hours 51 minutes ago
- 3 hours 54 minutes ago
- 3 hours 55 minutes ago
आज सर्वाधिक वाचन
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
| शीर्षक | वाचनसंख्या |
|---|---|
| पोळ्याच्या झडत्या | 218,038 |
| माझे फेसबूक स्टेटस-1 | 181,018 |
| शुभारंभ | 134,949 |
| रानमेवा - भूमिका | 109,396 |
| नागपुरी तडका - ई पुस्तक | 107,491 |
| आजचे शेतमालाचे बाजारभाव | 93,130 |
| सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता | 87,547 |
| कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! | 82,998 |
| भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा | 79,607 |
| उद्देश आणि भूमिका | 77,603 |
| विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह | 73,914 |
| विचारपूस | 71,842 |
| गणपतीची आरती ॥३५॥ | 67,865 |
| सत्कार समारंभ : वर्धा | 66,746 |
| शेतकरी संघटना लोगो, बिल्ला | 63,350 |
| किती चाटणार भारतपुत्रा? | 61,937 |
| जात्यावरची गाणी | 56,042 |
| माझे फेसबूक स्टेटस - 2 | 49,935 |
| महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात | 47,072 |
| हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। | 46,429 |

सर्व शेतकऱ्यांना
गंगाधर मुटे
सर्व शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त निरामय आरोग्याच्या हार्दिक शुभेच्छा
(शेतमालाचा उत्पादन खर्च आणि हमीभाव लक्षात घेता शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी, ऐश्वर्य, धनसंपदा येऊच शकत नाही. मी मूर्ख नसल्याने तशा शुभेच्छा देण्याचा महा मूर्खपणा मी करणार नाही. :D )
कर्जमाफी या शब्दात काहीच गैर
गंगाधर मुटे
#कर्जमुक्तीvsकर्जमाफी
कर्जमाफी या शब्दात काहीच गैर नाही असे तुम्हाला वाटत असेल किंवा सहज म्हणून तुम्ही कर्जमाफी असा शब्द वापरत असाल तर तुम्ही पिढीजात, वडिलोपार्जित, जन्मजात लाचार आहात, हे मी जीवशास्त्राच्या आधारे सिद्ध करून दाखवू शकतो.
डॉ. आंबेडकरांनी दलितांना आणि यु. जोशींनी शेतकऱ्यांना लाचारीचा त्याग करून हक्कासाठी मूठ आवळून स्वाभिमानाने लढण्याचा व जगण्याचा मंत्र दिला.
हक्क मिळवायची भाषा मर्द लढवैय्यांची आणि माफी मिळवायची भाषा नामर्द, याचक, लाचार व गुन्हेगारांची असते.
कर्जमुक्ती हा शब्द शरद जोशींचा पेटंट आहे असे लोकांना वाटत असल्याने क्रेडिट युगात्मा शरद जोशींना जाईल अशी त्यांना भीती वाटते. युगात्मा शरद जोशींविषयी असलेल्या आकसापोटी ही मंडळी कर्जमुक्ती ऐवजी कर्जमाफी शब्द वापरतात आणि स्वतःची लाचारी अधोरेखित करून शेतकऱ्यांनाही लाचार असल्याचे अधिकृत प्रमाणपत्र देऊन टाकतात. ही सर्व जन्मजात लाचार असल्याची लक्षणे आहेत.
लाचारीचा उगम गरिबीतून होतो, त्यासाठी गरिबी संपवणे आवश्यक आणि अनिवार्य ठरते पण गरिबी संपली म्हणजे लाचारी आपोआप संपते असेही नसते. मानवी आयुष्याच्या शेकडो वर्षाच्या उत्क्रांतीत निर्माण झालेली लाचारीची जनुके सहजासहजी स्वाभिमानामध्ये रूपांतरित किंवा परावर्तित होईल अशीही अजिबात शक्यता नसते.
ज्यांना अजूनही स्वतःची लाचारी संपवावी असे वाटत नाही त्यांच्याविषयी मला काही म्हणायचे नाही. संपत्ती, धनद्रव्य, हातात अमाप पैसा प्राप्त झाला म्हणजे लाचारी संपते असे अजिबात नाही. गर्भश्रीमंत किंवा अतिश्रीमंत सुद्धा लाचार असू शकतो.
पण
ज्यांना निदान पुढील आयुष्य आणि आपल्या पुढील पिढ्या लाचारीचे जिने संपवून सुखाने, समाधानाने व स्वाभिमानाने जगावे असे वाटत असेल तर त्यांनी आता तरी योग्य दिशेने वाटचाल करायला हवी.
तरच
कालांतराने मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात अंतर्गत शारीरिक जनुकीय रचनेमध्ये बदल होऊन स्वाभिमानाच्या दिशेने वाटचाल होऊ शकेल.
नाहीतर लाचारीत जन्मने, लाचारीत जगणे आणि लाचारित मरणे ही काळ्या दगडावरची रेघ आहे हे लक्षात ठेवा.
आयुष्य तुमचे निर्णयही तुमचाच!
© गंगाधर मुटे
#जौद्या_आप्ल्याले_काक्रा_लाग्ते