शीर्षक - शेतकरी बाप माझा
शेतकरी बाप माझा
आहे पोशिंदा जगाचा
नाव त्याचे अन्नदाता
करी प्रपंच बेताचा
काळ्या मातीत राबूनी
घाम गाळून कष्टाचा
ऊन वाऱ्या पावसात
शेत पीकवी अन्नाचा
नैसर्गिक आपत्तीनं
विविधांगी फाटलेला
व्यवसाय हा शेतीचा
जगवेल का बापाला
भूक वेदना पोटाची
आर्त किंकाळी फोडते
निरुत्तर प्रयासाने
सावकार तो शोधते
हमी भावासारखे ते
येती पोखळ संदेश
ओळखाना कोणीतरी
माझ्या कृषक बापास
मधुकर श्रावण दुफारे
मु. चिखलगाव , ता ब्रम्हपुरी
जिल्हा - चंद्रपूर

प्रतिसाद (1)
कवी मधुकर श्रावण दुफारे…
डॉ. मीरा पंडित
कवी मधुकर श्रावण दुफारे यांनी लिहिलेली "शेतकरी बाप माझा" ही कविता जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याच्या कष्टांचे, वेदनांचे आणि वास्तव्याचे अत्यंत संवेदनशील आणि हृदयस्पर्शी चित्रण करते. निसर्गाच्या लहरीपणाशी आणि कठीण परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्याची आर्त हाक या कवितेतून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.