Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२१ : निकाल

Sharad Joshi

शेतकरी साहित्य चळवळ

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२१ : वर्ष ८ वे

(अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम)

कोटी कोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण
शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक युगात्मा शरद जोशी

यांच्या ८६ व्या जयंतीदिनानिमित्त (३ सप्टेंबर २०२१)  
 
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२१ : निकाल

लेखनाचा विषय : रानातला पाऊस

            ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि तत्सम क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अनाकलनीयच आहे. शेतकरी गरीब आहे आणि ज्याच्याकडे आर्थिक सबळता नाही त्याची कुणीही दखल घेत नाही, कदाचित असाच याचा अर्थ आहे.
 
         पण; आता शेतकर्‍यांच्या मदतीला नवीन संगणकीय व आंतरजालिय तंत्रज्ञान धावून आलेलं आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अल्पशा खर्चात शेतीविषयाला आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होण्याची आणि भारतीय शेतीला वैश्विक साहित्यक्षेत्रात दृगोचर करण्याची जगाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात पहिल्यांदाच संधी निर्माण झाली आहे. या दृष्टिकोनातून बघितले तर शेतीक्षेत्र ऐतिहासिक वळणावर उभे आहे आणि नेमकी हीच संधी हेरून आम्ही आंतरजालाला विधायक व रचनात्मक कार्यासाठी वापरून घ्यायचे ठरविले आहे. त्याचीच प्रारंभिक पायरी म्हणून अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ यांच्यावतिने मागील ८ वर्षापासून विश्वस्तरीय लेखनस्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली जात आहे. विश्वस्तरीय लेखनस्पर्धेचे यंदाचे हे आठवे वर्ष.
 
        अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून ०३ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत बळीराजा डॉट कॉम (www.baliraja.com ) या संकेतस्थळावर विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२१ जाहिर करून यशस्वीरित्या पार पाडली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करतांना अत्यंत आनंद होत आहे.
       शेतीशी निगडीत विषय साहित्यामध्ये हाताळणार्‍यांची संख्याच उणीपुरी असल्याने आणि लेखनाचा विषय "शेती आणि कोरोना" असा जटिल असल्याने  या स्पर्धेला कितपत प्रतिसाद मिळेल या विषयीची धाकधूक मनात होतीच. परंतु यंदा उदंड प्रतिसाद मिळाला आणि देशविदेशातून मराठी भाषिकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला, ही बाब खचितच आनंद देणारी ठरली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिक्षक मंडळाने परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वी करून दाखविली, त्याबद्दल अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ त्यांची अत्यंत ऋणी आहे.
 
         लेखनस्पर्धा परिक्षक मंडळ : श्री बापू दासरी (नांदेड), श्री प्रदीप देशमुख (चंद्रपूर), सौ. धनश्री किशोर पाटील, सौ. माधुरी कळंबे, अझीझखान पठाण (नागपूर), प्रा. मनीषा रिठे, श्री संदीप धावडे दहिगांवकर, श्री रामेश्वर काकडे (वर्धा), श्री. राजेंद्र फंड (अहमदनगर), श्री सुधीर बिंदू (परभणी)

 
  

 Result
Ramram  स्पर्धेत सहभाग नोंदवणार्‍या सर्व सहकारी लेखक कवींचे मनपूर्वक आभार  Ramram
आणि
Congrats विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन..!! Congrats 
  • पारितोषिकाचे स्वरूप : मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके
  • पारितोषिक वितरण :
 
  1. २७ फेब्रुवारी २०२२ मध्ये रावेरी येथे आयोजित आठव्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल.
  2. स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहून पारितोषिक स्वीकारता येईल.
अत्यंत महत्वाचे निवेदन :
            पूर्वानुभव असा आहे कि, अनेक स्पर्धाविजेते संमेलनाला येण्याचे कबुल करूनही प्रत्यक्षात येत नाहीत, त्यामुळे सन्मानचिन्ह (momento) वाया जातात. त्यावर केलेला खर्च व्यर्थ जातो. त्यामुळे सर्व विजेत्यांनी दि. १५/०१/२०२२ पर्यंत आपली संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी करून घ्यावी. ज्यांनी नोंदणी केलेली असेल फक्त त्यांचे नावाचे सन्मानचिन्ह (momento) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती  http://www.baliraja.com/rep-regd  येथे उपलब्ध आहे.

सहकार्याच्या अपेक्षेत!

Share

प्रतिक्रिया

  • श्री. अनिकेत देशमुख's picture
    श्री. अनिकेत देशमुख
    शुक्र, 07/01/2022 - 13:17. वाजता प्रकाशित केले.

    सर्व सहभागी विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आयोजकांचे माननीय परीक्षकांचे मनापासून आभार

  • Dr. Ravipal Bharshankar's picture
    Dr. Ravipal Bha...
    शुक्र, 07/01/2022 - 19:43. वाजता प्रकाशित केले.

    सर्व विजेत्यांचे, परिक्षकांचे तसेच मुटे सर यांचे भरभरून अभिनंदन.
    मोठा पुष्पगुच्छ छोटा पुष्पगुच्छ

    Dr. Ravipal Bharshankar

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 15/01/2022 - 18:07. वाजता प्रकाशित केले.
    अत्यंत महत्वाचे निवेदन :
     
    पारितोषिक वितरण
     
    १) २७ फेब्रुवारी २०२२ मध्ये रावेरी येथे आयोजित आठव्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल.
    २) स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहून पारितोषिक स्वीकारता येईल.
    ३) पूर्वानुभव असा आहे कि, अनेक स्पर्धाविजेते संमेलनाला येण्याचे कबुल करूनही प्रत्यक्षात येत नाहीत, त्यामुळे सन्मानचिन्ह (momento) वाया जातात. त्यावर केलेला खर्च व्यर्थ जातो. त्यामुळे सर्व विजेत्यांनी दि. १५/०१/२०२२ पर्यंत आपली संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी करून घ्यावी. ज्यांनी नोंदणी केलेली असेल फक्त त्यांचे नावाचे सन्मानचिन्ह (momento) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती  http://www.baliraja.com/rep-regd  येथे उपलब्ध आहे.
    ४) पारितोषिक वितरण सोहळा नियोजित कार्यक्रम पत्रिकेत असला तरी कोरोना स्थिती काय असेल, निर्बंध काय असतील यावर अवलंबून असेल. सन्मानचिन्ह (momento) तयार होऊ शकतील किंवा नाही हे सुद्धा कोरोना परिस्थितीवर अवलंबून असेल. मात्र प्रमाणपत्र/सन्मानपत्र नक्कीच सहज शक्य आहे. नोंदणी करूनही कोरोना स्थितीमुळे विजेता कार्यक्रमस्थळी पोहचू शकला नाही तर प्रमाणपत्र/सन्मानपत्र पोस्टाने पाठवण्याचा विचार केला जाऊ शकेल. (मात्र मोमेंटो पाठवणे अशक्य असेल.)
    ५) १५ जानेवारी २०२२ हीच नोंदणीची अंतिम मुदत असेल. यावेळेस मुदतवाढ नसेल.
    ६) नोंदणी केलेल्या सर्वांना त्यांचा नोंदणी क्रमांक १६ जानेवारी २०२२ ला कळवला जाईल. १६ जानेवारी २०२२ ला रात्रीपर्यंत नोंदणी क्रमांक प्राप्त न झाल्यास संपर्क करावा. १७ जानेवारीला चूकभूल दुरुस्त केली जाऊ शकेल. नंतर यादी फायनल केली जाईल आणि त्यात बदल करता येणार नाही.
     
    सहकार्याच्या अपेक्षेत!
     
    गंगाधर मुटे
    अध्यक्ष
    अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ

    शेतकरी तितुका एक एक!

  • SatishGmalve's picture
    SatishGmalve
    शनी, 22/01/2022 - 17:18. वाजता प्रकाशित केले.

    सर्व विजयी स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन

    सतिशगुमालवे