![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
झाली आज माती
कर्जाच्या विळख्यात अडकली शेती
शेतकरी कुटुंबाची झाली आज माती
शेतातल्या मालाला भाव नाही आला
शेतकरी गळ्याला दोर लावून मेला
बँकेच्या कर्जापायी जप्ती आली घरावर
कर्ज फेडता येईना म्हणून विकलं हो वावर
सावकाराच्या कर्जाचा हिशेब लागला नाही
ओढून नेले त्याने गोठ्यातले गुरं-ढोरं गाई
कसायाच्या दावणीला शेतकरी बांधला गेला
निवडणुकीपुरता वापर करून सदा नंगा केला
अश्वासनांच्या खैरातीने उभा जीव जळे
दुखवटा पाळायला टपले बगळे कावळे
कीटकनाशक, बी-बियाणे अन् खताचे भरमसाठ भाव
हमीभावासाठी सरकार पास करीत नाही ठराव
शेतकऱ्याला अडकविले आहे कर्जाच्या विळख्यात
लुटारूंची टोळी आली पुढाऱ्यांच्या घोळक्यात
मुक्तविहारी
क्वार्टर क्र. जुने डी-८, थर्मल कॉलनी,
परळी वैजनाथ-४३१५२०
जि. बीड.
मो.९८६०९८५९११.
इमेल :muktvihari@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिका स्वीकारावी
मा. मुटे सर, स्पर्धेसाठी माझी प्रवेशिका स्वीकारावी.
मुक्तविहारी
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


शेतकरी तितुका एक एक!
पाने