Skip to main content Skip to footer
Home

Search form

Main menu

  • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

दिल्ली शेतकरी आंदोलन शेतीविरोधी : भाग-१

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 2:09 PM IST, Thu December 03, 2020
Attachment आकार
pratapgadache Ware.PNG 571.78 KB
Sahasik-02122020.jpg 517.58 KB
Tarun Bharat.jpg 153.37 KB
दिल्ली शेतकरी आंदोलन शेतीविरोधी : भाग-१

 
शेतीला उज्वल भविष्य येऊच नये कारण आमचा आजा, आमचा बाप, आमची माय गरिबीतच जगले आणि गरिबीतच मेले... तीच थोर परंपरा पुढे चालवत आम्हालाही दारिद्र्यातच जगायचे आहे. मायबापांकडून मिळालेला कर्जाचा डोंगर वारसा म्हणून आपल्या लेकराबाळांच्या छातीवर ठेवायचा आहे. चांगले जीवनमान जगणे हे पुढारी, उद्योजक, व्यावसायिक व पगारी नोकर यांचे काम आहे. आम्ही वडिलोपार्जित चांगले जीवन जगलो नाही... आपल्या लेकराबाळांनाही चांगले व सुखाचे जीवन जगू देणार नाही....अशी ज्याची मानसिकता असते... तो शेतकरी असतो. असे नसते तर "हमीभाव" मिळवणे व पुढाऱ्यांचे पाय चाटत सरकारच्या भिकेवर जगणे हा आमचा वडिलोपार्जित हक्क आहे... अशी सामूहिक मानसिकता तयार झालीच नसती.
====
ज्या शेतकऱ्यांना व शेतकरी पुत्रांना असे वाटते की ते दरिद्री नाहीत.... त्यांनी त्याच्यावर असलेला कर्जाचा हिशेब व बँक बॅलेन्स तपासावा. सर्व कर्ज फेडून झाल्यावर बँकेत १ रुपया जरी शिल्लक उरत असेल तर स्वतःला दरिद्री न समजता खुशाल कोट्याधीश समजावे. व अशा कोट्याधिशाने आपले डिटेल विवरण इथे जाहीर करावे. जरा बघू तर द्या कि नाक वरून बोलणारे शेतकरीपुत्र शेतीच्या भरवश्यावर किती कोट्याधीश झाले आहेत ते. 
====
नव्या अध्यादेशाचा विषय फार सोपा आहे. शेतमाल खरेदीची एकाधिकारशाही संपून त्यात स्पर्धा येणार आहे. त्यात हमीभावाला नख लागेल असे काहीही नाही. 
  1.  काही वर्षांपूर्वी एसटी महामंडळाची प्रवाशी वाहतुकीची एकाधिकारशाही होती. त्यात आता स्पर्धा आली. एसटी महामंडळ बंद पडले काय? त्यांनी आपल्या सेवेत सुधारणा केली त्याचा फायदा प्रवाशांना झाला.
  2. काही वर्षांपूर्वी कापूस पणन महासंघाचा एकाधिकार होता तेव्हा इतर राज्यातील व्यापाऱ्यापेक्षा महाराष्ट्रात कापसाला कमी भाव मिळायचे. आम्ही  कापूस पणन महासंघाच्या बरखास्तीची मागणी केली तेव्हाही असाच हलकल्लोळ झाला होता. काय झाले?  कापूस पणन महासंघाची एकाधिकारशाही जाऊन स्पर्धा आली तर हमीभाव संपला का? सीसीआय संपली का?
  3. काही वर्षांपूर्वी BSNL ची एकाधिकारशाही होती. तेव्हा नागपूरवरून मुंबईला फोन करायला प्रति मिनिट ५० रु. लागायचे. ती एकाधिक्कार संपुष्टात आल्यावर खाजगी व्यापारी ग्राहकांना लुटत आहेत का?
  4. मोबाईल क्षेत्रात स्पर्धा नव्हती तेव्हा प्रति मिनिट outgoing ६४/- रु प्रति मिनिट Incoming ३२/- रु. लागायचे. आता स्पर्धा आल्यावर त्यापेक्षाही जास्त दर पडतात का?
  5.  वीज पुरवठा करणाऱ्या संस्थांची सध्या एकाधिकारशाही आहे. खूपच स्वस्त वीज मिळत आहे का ग्राहकांना?
====
नव्या अध्यादेशाचा विषय फार सोपा आहे. पण शेतकऱ्याला पुढे करून आपापले राजकीय मनसुबे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर केला जात आहे.
====
काळाबाजार : नव्या अध्यादेशामुळे व्यापारी साठवणूक करून विक्री करताना काळाबाजार करतील असा एक युक्तिवाद केला जात आहे. अनेक कारणामुळे तशी अजिबात शक्यता नाही. पण तरीही हे खरे आहे असे गृहीत धरले तर काळाबाजार करून शेतमाल चढ्या भावाने व्यापाऱ्यांनी विकल्यास बाजारातील शेतमालाचे भाव वाढतील त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. काय नुकसान व्हायचे ते ग्राहकांचे होईल. शेतकऱ्यांचे नुकसान कसे होईल? मग नव्या अध्यादेशाचा विरोध करून त्याविरोधात ग्राहकांनी आंदोलन केले तर ते समजून घेता येईल पण जे आंदोलन ग्राहकांनी करावे असे आहे ते आंदोलन शेतकऱ्यांनी करण्यात काय तर्कशास्त्र असू शकते?
===
हमीभाव ठरलेल्या पिकांपेक्षा सरकारी हमीभाव न ठरलेली पिके भाव मिळण्याच्या बाबतीत अधिक चांगली व नशीबवान असतात...
आणि 
हे १००% टक्के खरे आहे कारण हमीभाव न ठरवलेल्या पिकाला "मागणी आणि पुरवठा" या अर्थशास्त्रीय सिद्धांताचा तरी काहींना काही फायदा होतो.
या उलट 
हमीभाव ठरलेल्या पिकांची स्थिती पिंजऱ्यात बंदिस्त केलेल्या पोपटासारखी आहे. या पिकांना सरकारच्या मर्जीवर अवलंबून राहावे लागते. त्याच असहाय स्थितीचा फायदा घेत या पिकांची सरकार एकतर्फी हजामत करते. "मुबलकता असेल तेव्हा मातीमोल भाव आणि तुटवडा असेल तेव्हा आयात करून सर्वोत्तम भाव न मिळू देण्याचे छडयंत्र'' रचून सरकार या पिकांना वाढीव भावही मिळू देत नाही. सरकारच्या ह्या कात्रीत शेतकरी एकतर्फी कापला जातो.
 
खरं तर दिल्लीला सुरु असलेले शेतकरी आंदोलन शेतकरीविरोधी आंदोलन म्हणावे असे हे आंदोलन आहे. या आंदोलनाला कुठलाच शेतीअर्थशास्त्र विषयक पाया नाही. इतकी प्रचंड शक्ती उभी करायची होती तर त्या शक्तीला अनुरूप मागणी तरी असायला हवी होती.
 
निदान उत्पादन खर्चावर आधारित भाव किंवा निदान स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासारखी दमदार मागणी तरी असायला हवी होती. आंदोलनामागील शक्ती आणि आंदोलनाची मागणी लक्षात घेतली तर हा मुंगी मारायला तलवार वापरण्याचा प्रकार वाटतो.
 
येथे एक बाब प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे कि शेतीचा प्रश्न हा निखळ आर्थिक प्रश्न आहे. यात भावनिक विचार करण्याला काहीही अर्थ नाही. मी शेतकरी आहे आणि शेतकरी आंदोलकही आहे म्हणून मी इतर शेतकऱ्यांविषयी अथवा शेतकरी आंदोलनाविषयी भावनिक जिव्हाळा दाखवू शकत नाही.
जेथे कर्तव्यकठोरता दाखवणे गरजेचे असते तेथे कच खाणे धोकादायक असते. समजा तुमच्या मुलाविषयी तुम्हाला कितीही जिव्हाळा असला तरी तो जर वाममार्गाने जात असल्याचे स्पष्ट दिसत असेल तरी तुम्ही त्याचे लाड, कौतुक व रक्ताचं नातं आहे म्हणून वाईटाचेही समर्थनच करणार का? करत असाल तर करा पण इतके लक्षात ठेवा कि नियतीचे नियम निष्ठुर असतात... तुमच्या चुकीचे फळ तुम्हाला भोगावेच लागेल आणि वाममार्गाने गेलेल्या तुमच्या जिव्हाळ्याच्या मुलाला सुद्धा.
 
व्यापक पण शेतीअर्थशास्त्राच्या विरोधात चुकीची व ती सुद्धा किरकोळ मागणी घेऊन प्रचंड ऊर्जा खर्च करणारे शोषकांना पोषक असे आंदोलन म्हणजे दिल्ली शेतकरी आंदोलन होय.
 
शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध करावा किंवा प्रचंड समर्थन करावे, असे नव्या कृषी विधेयकात काहीही नाही. दोन्ही बाजूंनी केवळ बागुलबुवा उभा करून राजकीय पोळी शेकण्याच्या संधी शोधल्या जात आहेत. अर्थशास्त्रीय विचाराचा किंचितही लवलेश नसलेल्या भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकीय पक्ष आपापली राजकीय शिकार टिपण्याचा प्रयत्न करत आहेत. 
जेव्हा जेव्हा शेतीमध्ये अर्थशास्त्रीय आधारावर बदल होण्याच्या शक्यता निर्माण होतात नेमके तेव्हाच उत्तर भारतात शेतकरी आंदोलन होते आणि शेतकरी चळवळीचा घात केला जातो. १९९० च्या सुमारास उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव या मागणीला यश मिळण्याची शक्यता झाली होती तेव्हाही महेंद्रसिंग टिकैत यांनी दिल्लीत किरकोळ मागण्यासाठी आंदोलन करून शेतकरी आंदोलनाचा घात केला होता. 
 
एकंदरीत दिल्ली येथे सुरु असलेले शेतकरी आंदोलन शेतीच्या दृष्टीने दुर्दैवीच म्हणावे लागेल.
 
- गंगाधर मुटे आर्वीकर

===========

१) दिल्ली शेतकरी आंदोलन शेतीविरोधी : भाग-१ >>> http://www.baliraja.com/node/2370

२) अप्रामाणिक शेतकरी आंदोलन : भाग-२ >>> http://www.baliraja.com/node/2412
३) शेतकरी आंदोलन नव्हे; राजकीय कुभांड : भाग-३  >>> http://www.baliraja.com/node/2413

४) निर्बुद्ध शेतकरी नेता टिकैत : भाग-४  >>> http://www.baliraja.com/node/2414
५) शेतकरी आंदोलन आंधळे व सरकार बहिरे : भाग-५ >>> http://www.baliraja.com/node/2416

६) बुद्धिबळ व भुजबळाची लढाई : भाग-६ >>> http://www.baliraja.com/node/2417


दिल्ली शेतकरी आंदोलन शेतीविरोधी
Farmer
Gangadhar Mute
shetkari
गंगाधर मुटे
गद्यलेखन
वाङ्मयशेती
शेतकरी
शेतकरी आंदोलन
शेतकरी संघटना
तरुण भारत

गंगाधर मुटे

गुरुवार, December 3, 2020 - 14:15
Permalink
New

  • Log in or register to post comments
साहसिक

गंगाधर मुटे

गुरुवार, December 3, 2020 - 14:16
Permalink
New




  • Log in or register to post comments
प्रतापगडचे वारे

गंगाधर मुटे

गुरुवार, December 3, 2020 - 14:16
Permalink
New


  • Log in or register to post comments
फेसबुक लिंक

गंगाधर मुटे

मंगळवार, February 2, 2021 - 00:17
Permalink
New

https://www.facebook.com/gangadharmute/posts/3887835021241157

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 7186 views

Search

User login

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 4 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • निलेश देवकर
  • spatil
  • डॉ. मीरा पंडित

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 17 *
Who's new नवीन सदस्य
  • spatil
  • BHAUPATIL Gadakh
  • sandip-7829
  • laxman18
  • Gauspasha Shaikh

Recent comments ताजे प्रतिसाद

  • लोकांना काय सांगू?
    24 minutes 16 seconds ago
  • मातीच्या कुशीत रुजलेले स्वप्न
    1 hour 15 minutes ago
  • लेखनाचा विषय : शेती/महिला…
    3 hours 17 minutes ago
  • अत्यंत हृदयाला भिडणारे आणि मातीशी घट्ट नाळ जोडणारे
    4 hours 59 minutes ago
  • वैचारिक लेखाचा विषय दिलेला…
    6 hours 22 minutes ago

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Footer menu

  • Contact

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For Sheti Arth Prabodhini अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ