थोडंस उरवायचं
उद्यासाठी पुरवायचं
जुळवाजुळव करायची
अन तिच्या कुशीत रुजवायची
उद्याच्या उत्पन्नाच्या आशेनं
कर्जाला मिठी मारली आहे
बेहिशेबी धोरणांमुळेच
आशा आता जिरली आहे
कर्जचं आहे'ना
टाकील की हो फेडून
फक्त लोकांच्या फतव्यांना बळी पडून
तुम्ही सगळे जाऊ नका हो सोडून
उद्याच्या स्वप्नांनसाठी
आज राबतो आहे
चार दिवस येतील सुखाचे
याच आशेने जगतो आहे.

आशावादी जीवनाची वाटचाल.
Krushna Ashok Jawle
आशावादी जीवनाची वाटचाल.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
गंगाधर मुटे
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

