नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मग मात्र लिहावीच लागते कविता...
मी उतरतो विहिरीत
हातावर शरीर तोलत
काठावरील झाडाला बांधलेल्या जुन्या नाड्याच्या धरून पदराला...
सुखरूप पोहचलो तळात
की, मनातच मानतो आभार
नाड्याचे आणि झाडाचे...
पण म्हणून मी नाही लिहीत कविता तरीही
कारण,
तेव्हा मी तुटून लोंबकळू लागलेला नाड्याचा पदर सांधत असतो
मनातच...
फुटबॉलमध्ये पाइपच्या
गुतलेला काढून
कचरा मला पुन्हा चढायचे असते
त्याच नाड्याने वर
आणि...
चढताना वाचवायचे असते डोके
हलणाऱ्या नाड्याभोवती घुटमळणाऱ्या दगड़ाने
आपली जागा सोडल्यास कदाचित...
पण म्हणून मी नाही लिहीत कविता तरीही
कारण,
गरम डोक्याचे फडके सोडायचे असते मला पोचताच काठावर...
बटण दाबतो स्टार्टरचे
तोंडाला कान लावतो पाइपाच्या
घेतो कानोसा पाण्याच्या चढण्याचा
पण म्हणून मी नाही लिहीत कविता तरीही
कारण,
मला पुन्हा हलवायचा असतो
पांगळा पाइप
पुन्हा एकदा...
अगदी तेव्हाच दिसते जेव्हा,
विजेच्या विक्षिप्तपणाच्या
तडाख्याने जळून काळवंडलेली
माझी इलेक्ट्रीक मोटार...
पण म्हणून मी नाही लिहीत कविता तरीही
कारण,
मला कायदा समजू लागलेला असतो...
माझ्याच कागदी सुरक्षेचा...
आणि ठोकतो एकदा बळहीन बोंब...
जाळणाऱ्यांचे पाप माझ्या बोकांडी टाकणारांच्या नावाने
पुन्हा एकदा...
तशातच
कविता माझी
प्रश्नांची टोपली घेते डोक्यावर
आणि जाते शासनदरबारी
फिरते विचारत जाब देवादिकांना...
कधी चीड़त...कधी रडत...
एव्हाना मी मोटार
खांद्यावर घेतलेली असते
रिवाइंडिंगवाल्याकडे नेण्यासाठी...
आणि गुणगुणत चालतो मनातच-
"कुणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे..."
अनवानी पायाने परतलेली माझी कविता
बांधावर उभी राहून
माझ्याच अंगावर सोडते कुत्रे
व्यवस्थेचे...
मी मात्र वाढवतो वेग चालण्याचा
कारण,
मला काळजी असते पीकपाण्याची...
मग ती अनावर हळवी होते
आणि सांगू लागते मालकी
माझ्या ओझ्यावर...
मी थकू नये
असं तिलाही वाटत असावं
कदाचित...
मग मात्र लिहावीच लागते कविता
कारण,
जगण्याचा एक हात पुढे करत असते ती
आशावादाचा...
रावसाहेब जाधव (चांदवड)
९४२२३२१५९६
rkjadhav96@gmail.com
प्रतिक्रिया
Dhirajkumar B Taksande
अप्रतिम छंद रचणा ....!!! जाधव सर.,
मग तर द्यावा लागतो प्रतिसाद......
कवितेविषयी
धन्यवाद सर
अगदी मनापासून!
रावसाहेब जाधव (चांदवड)
कविता
जबरदस्त वास्तववादी ...
जगण्याचा एक हात पुढे करत असते ती
आशावादाचा... रावसाहेब जाधव सर
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
कवितेविषयी
धन्यवाद!
रावसाहेब जाधव (चांदवड)
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण