Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



IT कार्यशाळा - सोशल मीडियाचा उपयोग - भाग-१०

 IT कार्यशाळा - सोशल मीडियाचा उपयोग - भाग-१०
 
सुतोवाच :
“जेथे न पहुचे रवी तेथे पहुचे कवी” असे म्हटले गेले पण ती केवळ आभासी कल्पना होती. पण आधुनिक इलेक्ट्रॉनिक व टीजीटल तंत्रज्ञानाने ही कविकल्पना देखील प्रत्यक्षात उतरवली आहे. जेथे सूर्य पोचू शकत नाही तेथे सुद्धा आधुनिक इलेक्ट्रॉनिक व टीजीटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वेगवेगळ्या स्वरूपात पण प्रत्यक्षात पोचणे माणसाला शक्य झाले आहे. संवाद आणि संभाषणाच्या क्षेत्रात या नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रचंड उलथापालथ होऊन हे संपूर्ण जग म्हणजे एक सभागृह झालेले जेथे जगाच्या दोन भिन्न टोकातली अनेक माणसे एकाच सभागृहात बसून आपसात संवाद साधावा, अशा तऱ्हेने परस्परांशी संवाद साधने आता सहज शक्य झाले आहे. अर्थात हे जग म्हणजे सर्वांसाठी ''हे विश्वचि माझे घर" झालेले आहे.
 
उद्दिष्टे : दुसऱ्या टप्प्यात आपण खालील बाबी शिकणार आहोत
 
अ] प्राथमिक :
 
१) आंतरजाल (Internet) म्हणजे काय? त्याची व मर्यादा.
२) नेट कनेक्टिव्हिटी : राऊटर, मोबाईल हॉटस्पॉट, ब्लु टुथ, डाटा केबल
३) ब्राउझर म्हणजे काय? इंटरनेट कसे पाहायचे?
४) इंटरनेट एक्सप्लोरर, microsoft Edge, फायरफॉक्स, सफारी, गुगल क्रोम व ओपेरा
५) सर्च इंजिन
६) Road Map आणि GPS
 
ब] लेखनपद्धती :
 
१) इंटरनेटसाठी देवनागरी लिपीतील लेखनपद्धती
२) Input Method Editors (IMEs) : गमभन, बरहा, गुगल IME, हँडराईटिंग  आणि स्पीच टू टेक्स्ट अर्थात बोललो ते टाईप होणे. 
३) देवनागरी फॉन्ट (Unicode) - मंगल, अपराजिता, उत्सव व कोकिळा, संस्कृती 
 
क] सामाजिक माध्यम (Social Media) :
 
१) सामाजिक माध्यमांची ओळख व प्रकार
२) संकेतस्थळ, फ़ेसबूक, ट्विटर, व्हाटसप व मोबाईल अँपचा वापर कसा करावा?
३) Sign Up, Sign In, अपलोड, डाऊनलोड, ईमेल, : ओळख आणि प्रात्यक्षिक
४) इंटरनेट बँकिंग
 
ड] सामान्य व्यक्तीसाठी सोशल मीडियाची उपयुक्तता.
 
१) संवाद साधने, संदेशाची देवाण-घेवाण.
२) अभिव्यक्तीचे प्रकटीकरण.
३) आवश्यक उपयोगाची हवी ती माहिती मिळवणे.
४) हवामानाचे अंदाज 
५) बँकिंग
६) उपयोगी वस्तूंची खरेदी-विक्री
७) शिक्षण व प्रशिक्षण
 
इ] गट/संघटना/समूहासाठी सोशल मीडियाची उपयुक्तता.
 
१) संवाद साधने, संदेशाची देवाण-घेवाण, विषयवार चर्चा, सामुहिक चर्चा, गट चर्चा, आगामी कार्यक्रमांची आखणी, संघटनात्मक बांधणी करणे.  
२) साहित्य व विचाराचा प्रसार करणे.
३) अपप्रचाराचे खंडण व खुलासे देणे.
४) समविचारी विचार प्रवाहाला मुख्य धारेत आणणे.
 
वरील विषयाचा पुढील भागात आपण शक्य तेवढा सविस्तर उहापोह करणार आहोत.
 
शुभेच्छेसह!
 
- गंगाधर मुटे
=======
Share

प्रतिक्रिया