Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




महा गड्या ! महा रड्या !!

लेखनविभाग: 
पद्यकविता

विश्वस्तरीय ऑनलाइन लेखन स्पर्धा - २०२०
विषय : शेती आणि करोना
पद्यलेखन प्रकार : पद्यकविता
शीर्षक : महा गड्या ! महा रड्या !!

महा गड्या ! महा रड्या !!


महा गड्या ! महागड्या, बेगड्या विकासाचं झकास रूपडं मांडलंस
तगड्या, रांगड्या निसर्गाला भकास नागडं सांगाडं करून सोडलंस

महा रड्या ! रडारडी करून समाज माध्यमातनं आभासी जगाशी नातं जोडलंस
पण रडीचा डाव खेळून 'माज' माध्यमातनं वास्तव जगाशी नातं तोडलंस

जमीन, समुद्र, आकाश, ताऱ्यांना झोडलंस
झाडं, झुडपं, पिकं, वाऱ्यांना तोडलंस

राने, वने, शेती, खोऱ्यांना मोडलंस
पर्वत, डोंगर, टेकड्या, दऱ्यांना फोडलंस

नद्या, नाले, ओढे, झऱ्यांना गाडलंस
जैवविविधता अन् संसाधनं या बऱ्यांना झाडलंस

परिसंस्था अन् पर्यावरण या खऱ्यांना फाडलंस
आमंत्रण मात्र प्रदूषण करणाऱ्या साऱ्यांना धाडलंस

प्राणी अन् पक्ष्यांच्या शरीरात सुखानं नांदणाऱ्या करोनाला छेडलंस
रानटीपणानं नको तेच प्राणी अन् पक्षी खाऊन कोविडनं स्वत:लाच पिडलंस

सर्व धर्मांच्या धार्मिक स्थळांना मरणाला घाबरून बंद पाडलंस
दांभिकपणे देव देव करून देवातल्या देवत्वाला खोटं पाडलंस

ढोंगी श्रद्धेच्या पुराव्याचं प्रदर्शन जगासमोर निर्लज्जपणे मांडलंस
नैतिक मुल्यांना अनैतिकतेच्या ढिगाऱ्याखाली निर्दयपणे गाडलंस

माणुसकीला 'आयसोलेशन' अन् 'क्वॉरंटाइन' करून कोंडलंस
'लॉकडाउन' करून किती भ्रष्टाचारी करोना विषाणूंना पकडलंस ?

'डिजिटल' अन् 'ऑनलाइन' वाटमारीनं शिक्षणक्रांतीला उघडं पाडलंस
'मेडिकल' अन् 'सलाइन' लुटमारीनं आरोग्यक्रांतीला नागडं पाडलंस

बळे बळे बळी जायला बळवंत बळीराजाला बळजबरीनं भाग पाडलंस
कृषिप्रधान देशाच्या कृषीवंत कृषीवलाला कृशवंत कृशवल करून गाडलंस

छद्म देशभक्तीला 'ब्रँडिंग' अन् 'मार्केटिंग' करून बाजारात मांडलंस
सच्च्या देशभक्तीला, देशभक्तांना अन् देशाला देशोधडीला धाडलंस

भारत, हिंदुस्थान अन् 'इंडिया' अशी अदृश्य फाळणी करून राष्ट्राला तोडलंस
जातिधर्माचे 'कंटेनमेंट झोन' करून भेदभावाच्या करोनानं समाजाला फोडलंस

समाजकारणाचा खोटा आव आणून राजकारणात स्वत:ला जखडलंस
विघातक धर्मकारणापायी विधायक अर्थकारणाला मुळासकट उखडलंस

निसर्ग - सौंदर्य, निसर्ग - सामर्थ्य, निसर्ग - समृद्धीला ओरखडलंस
निसर्ग - संपदा, निसर्ग - संस्कार, निसर्ग - संस्कृतीला ओरबडलंस

आता तर निसर्गानं तुला तुझी औकात दाखवून तुझी घमेंड तोडलीय !
अमानुषपणा सोडून माणसासारखं वागायला लावून तुझी खोड मोडलीय !

महा गड्या ! गंडवागंडवी करून निसर्गाला गंडवता गंडवता तूच गंडलायस !
महा रड्या ! रडवारडवी करून निसर्गाला रडवता रडवता तूच रडलायस !

स्पर्धकाचे नाव : महान चव्हाण.
निवासी पत्ता : ६/४०; बी.आय.टी. इमारत, ताडवाडी, माझगाव, मुंबई - ४०० ०१०.
संपर्क क्रमांक : ९३२ ४४ ७७ ६५२
विरोप पत्ता : mahaanchavan@gmail.com

Share

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 10/10/2020 - 15:23. वाजता प्रकाशित केले.

    Congrats Congrats प्रवेशिकेचे स्वागत छोटा पुष्पगुच्छ

    शेतकरी तितुका एक एक!

  • MAHAAN CHAVAN's picture
    MAHAAN CHAVAN
    गुरू, 05/11/2020 - 13:46. वाजता प्रकाशित केले.

    मोठा पुष्पगुच्छ छोटा पुष्पगुच्छ

    Ramram Ramram Ramram Ramram

    Congrats Congrats Congrats Congrats

    धन्यवाद !

    Namo Namo Namo Namo

    आपला विनम्र विनीत ,

    Nono Nono Nono Nono Nono Nono

    महान चव्हाण

    Cheer Cheer Cheer Cheer Cheer

    Dance Dance Dance Dance Dance

    Rofl Rofl Rofl

    Hurray Big-LOL Hurray

    MAHAAN CHAVAN

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 31/10/2020 - 17:15. वाजता प्रकाशित केले.

    स्मायलीजचा छान वापर केला आहे. Smile

    शेतकरी तितुका एक एक!

  • MAHAAN CHAVAN's picture
    MAHAAN CHAVAN
    शनी, 07/11/2020 - 09:01. वाजता प्रकाशित केले.

    पुनश्च धन्यवाद HTMLचे


    मुटे सर, आपण माझ्या 'धन्यवाद!' या प्रतिसादाचे कौतुक केलेत, याबद्दल पुनश्च धन्यवाद! पण सर, ही किमया दोन प्रकारच्या HTML मुळे घडली. त्यातील पहिले जगप्रसिद्ध HTML म्हणजे Hyper Text Markup Language आणि दुसरे HTML म्हणजे H - HTML ; T - तंत्राविषयी ; M - मुटेंचा ; L - लेख. ( संदर्भ : - बळीराजावर वापरण्यायोग्य HTML कोडिंग : लेखक - गंगाधर मुटे : दिनांक २०-१०-१९ )


    आपली ' माहिती तंत्रज्ञान ( IT ) कार्यशाळा लेखमाला ' ही बळीराजाला तंत्रस्नेही
    ( टेक्नोसॅव्ही - Technosavvy ) होण्याकरिता अनमोल मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ आहे. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणून माझा स्वानुभव प्रात्यक्षिकासहित माझ्या ' धन्यवाद ! ' या प्रतिसादाच्या स्वरूपात मी आपणा सर्वांसमोर सादर केलेला आहेच !

    आपला विनम्र विनीत,

    महान चव्हाण.

    Big-LOL Hurray Big-LOL

    MAHAAN CHAVAN

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 01/11/2020 - 08:39. वाजता प्रकाशित केले.

    आणि दुसरे HTML म्हणजे H - HTML ; T - तंत्राविषयी ; M - मुटेंचा ; L - लेख.  Hurray  Big-LOL

    Cheer   Dance  Cheer   Dance

    Rofl

    हाच पूर्ण प्रतिसाद  ''बळीराजावर वापरण्यायोग्य HTML कोडिंग ; दिनांक २०-१०-१९'' या धाग्यावर टाकावा.

    शेतकरी तितुका एक एक!

  • MAHAAN CHAVAN's picture
    MAHAAN CHAVAN
    मंगळ, 24/11/2020 - 10:38. वाजता प्रकाशित केले.

    Hurray Hurray Hurray

    ' अनमोल मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ ! '

    बळीराजाला तंत्रस्नेही
    ( टेक्नोसॅव्ही - Technosavvy ) होण्याकरिता ' अनमोल मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ ' अशी ख्याती झालेली आपली ' माहिती तंत्रज्ञान ( IT ) कार्यशाळा लेखमाला ' ही सध्या आपण का खंडित केली आहे ? आम्ही आपल्या नवनवीन लेखांची खूप आतुरतेने आणि मोठ्या उत्सुकतेने वाट पहात असतो.

    आपला रसिक वाचक,

    महान चव्हाण

    Studying Studying Studying

    Dance Dance Dance Dance Dance

    Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl

    MAHAAN CHAVAN

  • पाने