![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शोषकांना पोषक पोटभरू कविता
आता तो शेती करत नाही
जीवनाचा डाव हरत नाही
केली तेव्हा पिकली नाही
पिकली तेव्हा विकली नाही
विकली तेव्हा भावली नाही
फुटकी दमडी गावली नाही
घरात गरिबी मावली नाही
भाव नाही तर वाव नाही
वाव नाही तर नाव नाही
नाव नाही तर पत नाही
पत नाही तर प्रतिष्ठा नाही
मग शेतीशी द्रोह करून
तो राजाश्रय घेतो
आणि प्रसवायला लागतो
एकापेक्षा एक अशा सरस
अप्रतिम, भन्नाट
शोषकांना पोषक अशा
पोटभरू कवितांचा
नजराणा.....!!
आता तो अजय आहे
क्रय आहे, विक्रय आहे
पावलागणिक विजय आहे
शिरी शोषकांचे अभय आहे
© गंगाधर मुटे १९/०७/१९ #थेट_बांधावरून
#अभंग #शेतकरी_कविता #शेतकरी_गीत #शेतीकाव्य