नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गुदस्ता पाऊस आलाच नव्हता
कुठं पडला, कुठं पडलाच नव्हता
पीक उगवलंच नव्हतं
जे उगवलं ते जगलंच नव्हतं
जे जगलं ते वाढलंच नव्हतं
जे वाढलं ते फ़ळलंच नव्हतं
निसर्गानंच केली होती! हजामत केली होती!! बिनापाण्यानं केली होती!!!
सरकार आलं होतं, मुठभर घेऊन आलं होतं
आमच्या हातावर भुरका ठेऊन म्हणालं होतं
घेन्न! आता कसं वाटsssssते?
आम्ही म्हणालो होतो
मsssssस्त वाटते! गोsssssड वाटते!!
पण एक येडं होतं, सर्वांच्या पुढं होतं
मात्र ते मख्ख होतं, ते बोल्लंच नव्हतं
हात काही त्यानं पसरलाच नव्हता....!
औंदा मात्र पाऊस आला
जिकडेतिकडे कहर झाला
डोंगर-दर्या हुदडत गेला
छाती फोडून दरवाजा केला
उभं पीक वाहून गेलं
जे वाहवलं नाही ते दबून गेलं
जे दबलं नाही ते कुजून गेलं
जे कुजलं नाही ते सडून गेलं
जे सडलं नाही ते मरून गेलं
निसर्गानंच केली! हजामत केली!! पाणी लाऊन केली!!!
सरकार आलं, मुठभर घेऊन आलं,
आमच्या हातावर भुरका ठेऊन म्हणालं,
घेन्न! आता कसं वाटsssssते?
आम्ही म्हणालो,
मsssssस्त वाटते! गोsssssड वाटते!!
पण एक येडं होतं, सर्वांच्या मागं होतं
हात काही त्यानं पसरलाच नाही....!
मात्र ते मख्ख नव्हतं, आता ते बडबडत होतं
स्वत:शीच पुटपुटत होतं
"च्यामारी! आयला!! च्यामायला!!
जवा-जवा पिकलं, भरमसाठ पिकलं
तवा-तवा ह्यांनी, सस्त्यामधी लुटलं
रुपयाचा शेतमाल चार आण्यात नेला
म्हून माहा धंदा घाट्यामंधी गेला
ह्यांच्यापायी लक्षुमीवर अवदसा आली
गावासंग ग्रामदेवता पुरी भकास झाली"
"हक्काचं टनभर सरकारवर लुटणं
कणभर मदतीची भीक मागत सुटणं"
"अरे छी! अरे थू!! असल्या जिंदगीवर
भिकंपरिस उपास बरा हक्क मिळेपावतर"
येडा असेल तो-तो, ’अभय’ बडबडत असतो
मात्र आम्हा शहाण्यांना फ़रक पडत नसतो
- गंगाधर मुटे ’अभय’
---------------------------------------------------------
प्रतिक्रिया
शेत्कर्याच्या वेदनान्चि जानिव
शेत्कर्याच्या वेदनान्चि जानिव असनारे लोक या भारत देशाच्या पाठिवर अतिशय अल्प प्रमानात आहेत हे खरे दुर्दैव आहे. आनि शासन आनि सत्ताधारि ( मग ते कोनत्याहि पक्शाचे असोत ) सर्व समजत असतानाहि जानिवपुर्वक डोळेझाक करतात त्यामुळे हा घटक स्वातन्त्र्यपुर्व काळापासुनच सर्वात उपेक्शित राहिला आहे.आपल्यासारखे मोजकेच लेखक या उपेक्शितान्चे दु:ख जानुन त्यान्च्याविशयि लिहितात हेहि नसे थोडके !
धन्यवाद
धन्यवाद महादेवराव कापूसकरी सर.
शेतकरी तितुका एक एक!
"हक्काचं टनभर सरकारवर
"हक्काचं टनभर सरकारवर लुटणं
कणभर मदतीची भीक मागत सुटणं"
"अरे छी! अरे थू!! असल्या जिंदगीवर
भिकंपरिस उपास बरा हक्क मिळेपावतर"
येडा असेल तो-तो, ’अभय’ बडबडत असतो
मात्र आम्हा शहाण्यांना फ़रक पडत नसतो
kavigore
धन्यवाद
धन्यवाद कविता गोरे
या कवितेची आठवण काढून दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
कविता लिहिल्याच्या दिवसापासून पुन्हा मीच वाचली नव्हती. अशा अनेक कविता/लेख आहेत की ते पुन्हा वाचायची मी हिंमत करू शकत नाही.
आज ही कविता फेसबूकवर शेअर करत आहे.
शेतकरी तितुका एक एक!
(विषय दिलेला नाही)
kavigore
ज्वलंत!
ज्वलंत!
आपण दोघे भाऊ/भाऊ,बांधावर बसुन 'पेरु' खाऊ...
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण