Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***IT कार्यशाळा - खिसेकापूपासून सावधान : सोशल मीडियाचा वापर जपून करा. - भाग-१३

IT कार्यशाळा - खिसेकापूपासून सावधान : सोशल मीडियाचा वापर जपून करा. - भाग-१३
 
खरं तर सोशल मीडियाचा वापर करतांना विशेष अशी काळजी घेण्याची गरज नाही फक्त इंटरनेटच्या बाहेर आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात जितकी काळजी घेत असतो, तेवढी घेतली तरी पुरे आहे. पण खरी गंमत अशी आहे कि वापरकर्ते नेहमी हीच बाब विसरून जातात आणि सोशल मीडियाचा वापर गांभीर्याने न करण्याची सहज चूक करून बसतात.

सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची सावधगिरी :

 
 1. आपण आपल्या घराबाहेर पडताना दागिने ठेवलेल्या कपाटाची चाबी उघड्यावर अशीच अस्ताव्यस्त टाकून देत असतो का? नाही ना? मग दागिन्यांच्या कपाटाची चाबी जशी सांभाळून ठेवायची असते अगदी तसाच आपला पासवर्ड सांभाळून ठेवायचा असतो.
 2. आपल्या घरातली एखादी व्यक्ती उनाड, उधळी आणि बेजबाबदार असल्याची आपली खात्री झाली तर घरातील महत्वाचा ऐवज तिच्यापासून आपण सांभाळून ठेवत असतो ना? अगदी तसाच आपला त्या व्यक्तीपासून सुद्धा पासवर्ड सुद्धा सांभाळून ठेवायला हवा.
 3. सार्वजनिक ठिकाणी आपले वर्तन सभ्यपणाचे असते, तितकेच सभ्यपणाचे वर्तन सोशल मीडियातही ठेवायला हवे.
 4. प्रत्यक्ष सार्वजनिक जीवनात आपले जसे वर्तन असेल अगदी तसेच वर्तन सोशल मीडियात ठेवावे. आगाऊ दिखाऊपणा केल्यास फार काळ दिखाऊपणा आपण लपवू शकत नाही. कधी ना कधी बिंग फुटणारच असते. त्यांनतर होणारी आपली मानहानी असहनीय असू शकते.
 5. अनोळख्या व्यक्तीला जसे आपण आपल्या मनातील रहस्य कधी सांगत नाहीत आणि मनातील गोपनीय अंतरंग उघडून दाखवत नाही त्याप्रमाणेच सोशल मीडियातील अनोळखी व्यक्तींशी सावधगिरीने वागणे आवश्यक असते. संबंध कामापुरतेच असावे.
 6. जसे प्रत्यक्ष जग रंगीबेरंगी-चित्रविचित्र लोकांनी भरलेले आहे तसाच सोशल मीडिया देखील रंगीबेरंगी-चित्रविचित्र लोकांनी भरलेला आहे, हे कायम ध्यानात असू द्यावे.
 7. आपल्या नगरात, वस्तीत, गावात जसे पॉकेटमार, लुटारु, भुरटे, वाटमारी करणारे, चोर, लबाड, ढोंगी, अतिशहाणे, दीडशहाणे वगैरे असतात ते सर्व आता सोशल मीडियातही उपस्थित आहे. सावध राहा.
 8. काही सोंगाडे बनावट चेहरे घेऊन तुमच्याशी मैत्री करायला व हितगुज करायला येऊ शकतात. स्त्रीच्या नावाची बनावट आयडी घेऊन येणारी स्त्रीच असेल असे नाही, तो कदाचित पुरुष असू शकतो. किंवा पुरुषाच्या नावाची बनावट आयडी घेऊन येणारा पुरुषच असेल असेही नाही, ती कदाचित स्त्री असू शकते. कुणाशी कितीही घनदाट मैत्री असली तरी कौटुंबिक किंवा गोपनीय स्वरूपाची माहिती त्यांना देऊ नका.
 9. कौटुंबिक समस्यांचे निवारण करायचे असेल तर आपल्या ओळखीच्या मित्राशी किंवा नातेवाइकांशीच संवाद करा.
 10. घरी मोबाईल असेल तेव्हा तो मोबाईल त्या व्यक्तिजवळच असेल असे नाही. घरातील अन्य सदस्यांजवळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वत्रिक स्वरूपाची बाब नसून विशिष्ट व्यक्तीशीच बोलावी अशी बाब असेल तर आधी दुसऱ्या एन्डवर संबंधित व्यक्तीच आहे याची खात्री करून नंतरच संवादाला सुरुवात करा.
 11. आपण आपल्या दैनंदिन जीवनात असभ्य, अभद्र, अश्लील व शिवराळ स्वरूपाचे वर्तन करत नसाल तर सोशल मीडियातही अजिबात करू नका. "इथे कोण पाहते" असे समजून चुकीचे वर्तन करायला गेलात तर आयुष्यभर कणाकणाने मिळवलेली पत व इज्जत एका चुकीमुळे धुळीस मिळू शकते.
 12. आपण आपल्या दैनंदिन जीवनात असभ्य, अभद्र, अश्लील व शिवराळ स्वरूपाचे वर्तन करत  असाल तरीही सोशल मीडियात असे काही करू नका. प्रत्यक्ष जीवनातील वर्तणुकीचे पुरावे मिळणे अवघड असते पण सोशल मीडियातील संभाषणाचे पुरावे कायम उपलब्ध असतात. सबब सवयी बदलून माणुसकीत येणे हितावह आहे.
 13. अनावश्यक व खात्री नसलेले मोबाईल ऍप्स डाउनलोड करून इन्स्टॉल करू नका. कदाचित एखादे अँप तुमच्या मोबाईलची हेरगिरी करून मोबाईल मधील फोटो, व्हिडियोसहित अन्य डाटा त्याच्या निर्मात्या मालकाकडे पाठवू शकते. म्हणून खात्रीशीर व आवश्यक ऍपच इन्स्टॉल करा.
 14. कोणत्या ऍपला वापरासाठी कोणकोणती परवानगी द्यायची याची सुविधा मोबाईल मध्ये असते. डॉक्युमेंट बघण्याची व कॅमेरा-व्हीडिओ वापरण्याची परवानगी अनावश्यक ऍप्सना देऊ नका. सेटिंगमध्ये जाऊन सेटिंग व्यवस्थित करून घ्या.
 15. तुम्हाला किंवा तुमच्या मोबाईल नंबरला किंवा तुमच्या ईमेल आयडीला हजारो/लक्षावधी रुपयाची लॉटरी लागल्याचा मॅसेज आल्यास तो अजिबात उघडू नका. वाचू तर नकाच नका. लगेच डिलीट करा आणि शक्य झाले तर असा संदेश पाठवणाऱ्याला BLOCK करा.
 16. बिनाजामीन व बिनडॉक्युमेंटने तुम्हाला सहज सुलभ कर्ज देतो, असा मॅसेज आल्यास तो अजिबात उघडू नका. वाचू तर नकाच नका. लगेच डिलीट करा आणि शक्य झाले तर असा संदेश पाठवणाऱ्याला BLOCK करा.
 17. मी म्हातारी झाली आहे व मला कुणीच वारस नसल्याने बँकेतील रक्कम मला दान करून टाकायची आहे, असे सांगत तुम्हाला सदर व्यक्ती काही माहिती मागत असेल तर अजिबात देऊ नका. 
 18. तुम्हाला सहज कर्ज/लॉटरी/दान देईल असा कुणीच व्यक्ती या संबंध जगात उपलब्ध नाही. मोहात पडून स्वतःचा घात करून घेऊ नका. 
 19. अनोळखी नंबरवरून फोन आल्यास आणि संशयास्पद वाटल्यास तो "१ नंबर दाबा/२ नंबर दाबा" असे सांगत असेल तर अजिबात कोणतेच बटन दाबू नका. कॉल डिस्कनेक्ट करून मोकळे व्हा आणि आपला खिसा कापायची कुणाला संधी देऊ नका.
 20. सोशल मीडियात चॅटिंग करून वेळ घालवण्याऐवजी नवनवीन बाबी शिकण्याला प्राधान्य द्या आणि आपले ज्ञानभांडार आणखी समृद्ध करा.
तूर्त इतकेच! बाकी नंतर यथावकाश बघुयात!!
 
शुभेच्छेसह!
 
- गंगाधर मुटे
=======
 
Share

प्रतिक्रिया