नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बळी
एक शोधी खोल
विहीरीचा तळ
गारपिटी झळ
सोसवेना....१
दुजा मारी जोर
फाशी घ्याया दोर
स्वतःलाच चोर
समजुनी.....२
तिजे रिचविली
विषाची बाटली
विश्वासाची बोली
नाकारीत....३
चवथ्याला घाई
रेल्वे रूळाखाली
सोडूली पखाली
वा-यावरी....४
पाचवा उधळी
आंदोलन स्थळी
स्वतःचीच होळी
पेटविण्या....५
अवकाळी फंदा
सोसतो पोशिंदा
मनाचाच कुंदा
खणतांना....६
कलियुगी जार
वामनावतार
'बळी' गपगार
पाताळात.....७
नरेन्द्र बापूुजी खैरनार
मु.पो.ता.साक्री जि.धुळे
भ्र. ९४२१८८४०२४
प्रतिक्रिया
सुरेख कविता.
सुरेख कविता.
शेतकरी तितुका एक एक!
बळी
विदारक वास्तव रेखाटणारी सुयोग्य वॄत्तातील कविता. वाह व्वा !
हेमंत साळुंके
पाने