नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
येतो बरंका सायेब!
खरं तर निघत न्हाई पाय
पन मुदत देना्र न्हाई म्हन्तासा
गरीबानं करावं तरी काय?
ईमान कंपनीला तुमी
दिले म्हणे चारशे कोटी
जप्ती आननार सांगतासा
माज्या पन्नास हजारापोटी
त्यांच्या ईमानातून
फिरशीला ढगांच्या तळ्यात
तवा ईचारा वरूणदेवाला
बरसशील का गरीबाच्या मळ्यात
ईमानातली परी आणंल तुमास्नी पक्वानाचं ताट भरल्यालं
तवा माजी पोरं खात असतील शिळंपाकं उरल्यालं
ब्यांक-म्यानेजरसायेब, इमानात जवा किंगफ़िसर बीअर पिशीला
तवा इसरू नगा म्या आनि माझी बायको सुशीला
बाटली हाये आमच्याबी खिशात
ईख पिवून उद्याच्याला, आमी बी येनार आकाशात
प्रतिक्रिया
शेतकरी जीवनातील हताशपणा
शेतकरी जीवनातील हताशपणा चांगला व्यक्त झालाय.
शेतकरी तितुका एक एक!