नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*माणसासाठी कणसात दाना*
खळ्यावरचे खळते जगणे
कागदावरच पडती राशी
माना फिरवती ऊखळी सांधे
नगरामधले गणित उपाशी.. .. ..1
आशयाचे काळीज ओझे
शब्द कुणबी मळतो खांदा
सालभराच्या सोसिक तोंडी
सण पोळ्याचा रसिक मांडा.....2
हात हिकमती ओरबाडणारे
नागडी होते सुपीक माती
पंगत एकच खाणारांची
राबणारांच्या हजार जाती....3
मांडीवरती दुष्कळाच्या
हंबरणारे दुधाळ चेहरे
पट मांडता महागाईचा
बदली सोंगट्या आपली घरे....4
बुरखा ओढून निजती नगरे
माणुसकीने टाकल्या माना
माती मात्र जपते अजून
माणसासाठी कणसात दाना....5
✳रावसाहेब जाधव
चांदवड(9422321596)
प्रतिक्रिया
लेखनाचा विषय
लेखनाचा विषय "शेतकरी" असा नसून "शरद जोशी" असा आहे. त्यामुळे लेखन शरद जोशी या व्यक्तीमत्वाशी निगडीत किंवा कार्य अधोरेखीत करणारे किंवा शरद जोशींच्या विचारांचा ओझरता तरी उल्लेख करणारे असणे आवश्यक आहे.
पाने