

साद
आकाश दाटलेले पान्हा तरी सुटेना
शोधून माळरानी झाडी कुठे दिसेना
दे साद वासरांना या हंबरुन गायी
चैतन्य लोपलेल्या भोतास आकलेना
वास्तूत वृक्षवेली शेते उजाड झाली
उत्पन्न वाढ होते नापेर लावताना
पाण्यास कोंडलेले घालून बांध आता
साठा सलाइनचा की सूज,हे कळेना
जेंव्हा निसर्ग विश्वा पर्जन्य साद घाली
वृथाच हक्क वाटे तो मानवा, पिकांना
विजय नांगरे
Comments
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....! :congrats: :congrats:
शेतकरी तितुका एक एक!
Pages