


|| आता तयार व्हावे | लढण्यास लेखणीने |
रक्षण अबोलतेचे | करण्यास लेखणीने ||
|| जेव्हा चहूदिशांनी | वादळ विराट तेव्हा |
द्यावे अभय दिव्याला | जळण्यास लेखणीने ||
दिनांक : शनिवार, दि. २१ व रविवार, दि. २२ फेब्रुवारी, २०२६
-=- कार्यक्रमपत्रिका -=-
दुपारी ०१.०० ते ३.०० : उद्घाटन सत्र
प्रमुख पाहुणे : मा. डॉ. सुरेश मोहितकर, माजी प्राचार्य, चंद्रपूर
संयोजक : मा. प्रमोदकुमार बेलसरे, डायरेक्टर, इंडियाना सुक्रो टेक पुणे प्रा. लि.
समन्वयक : मा. राजकुंवर बेलसरे (सातारा)
सत्र - ३ : दुपारी ०३.४० ते ०४.३० : शेतकरी कवी संमेलन - १
दुपारी ०४.३० ते ५.०० : चहापान
सत्र - ६ : रात्री ०७.०० ते ८.०० : सांस्कृतिक कार्यक्रम
(पारंपारिक जागरण, गोंधळ)
संगीत संचालक : मा. बिपीन वर्तक व सहकारी
रात्री ०८.३० ते ९.०० : प्रतिनिधी स्नेहभोजन
बीजभाषण : मा. गंगाधर मुटे (वर्धा)
सत्र - ८ : सकाळी १०.०० ते ११.०० : शेतकरी गझल मुशायरा
प्रमुख अतिथी : मा. ईंजी. वसंत जोशी, सातारा
विशेष अतिथी : मा. दिलीप भोयर, शेतकरी नेते, अमरावती
प्रमुख उपस्थिती : मा.प्रमोदकुमार बेलसरे डायरेक्टर, इंडियाना सुक्रो टेक पुणे प्रा. लि
दुपारी ०१.०० ते ०१.३० : प्रतिनिधी स्नेहभोजन
संयोजक : मा. प्रमोदकुमार बेलसरे
नियोजन समिती : मा. प्रतिभा काळे, सचिव, शेती अर्थ प्रबोधिनी (वर्धा)
आयोजन समिती : मा. कु. राजकुंवर बेलसरे, मा. संतोष निकम आणि समस्त गावकरी मंडळी, दाभे मोहन, ता. महाबळेश्वर, जिल्हा. सातारा
: मार्गदर्शक :
मा. सरोजताई काशीकर
मा. अॅड वामनराव चटप
=-=-=-==-=-=-==-=-=-==-=-=
प्रतिनिधीसाठी महत्वाची माहिती आणि सूचना 
https://www.baliraja.com/node/3351
महाबळेश्वर संमेलनाला कसे पोचावे 
https://www.baliraja.com/node/3292
कार्यक्रमपत्रिका 
https://baliraja.com/kp14
प्रतिनिधी नोंदणी पद्धत 
https://baliraja.com/rep-regd
नियोजन 
https://baliraja.com/14-Ni
=-=-=-=-=-=-=-=-=-=-=
| Attachment | Size |
|---|---|
| Logo-14sss.png | 917.87 KB |

Comments (1)
प्रति,
गंगाधर मुटे
प्रति,
मा. गंगाधरजी मुटे
१४ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, महाबळेश्वर
सप्रेम नमस्कार,
आपण २१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी महाबळेश्वर येथे संपन्न होणाऱ्या १४ व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड केली, त्याबद्दल व्यक्तिशः आपले व संयोजन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनस्वी धन्यवाद. ह्या गौरवाचा मी सानंद स्वीकार करतो. हा सन्मान स्वीकारताना मला निश्चितच आनंद होतोय. हे संमेलन एका वैचारिक बांधिलकीतून, भूमिकेतून जन्माला आलंय. ते अनेक लिहित्या हातांना लिहिण्यास, व्यक्त होण्यास प्रेरित करतेय, ही गोष्ट मला खूप थोर वाटते. ह्या चळवळीशी, संमेलनाशी आरंभापासून मला जोडता आलं, ह्याचा आनंद व अभिमान वाटतो. सोबतच ह्या विचारपीठावर आपल्या सर्वांना डोळस भूमिका देणारे, शेतकऱ्यांचे पंचप्राण आदरणीय शरद जोशींनी पहिल्यांदा अध्यक्षपद भूषविले असल्याने मनात एक प्रकारचं आदरयुक्त दडपण आहे. साहित्य चळवळीच्या माध्यमातून शेतकरी संघटनेचा विचार प्रवाहित करणारे अनेक महत्वाचे साहित्यिक, समीक्षक ह्या संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. ही परंपरा खूप समृद्ध, उज्वल अशी आहे. ह्या उज्वल परंपरेचं निश्चित असं 'भान' मला आहे. अशा एका महत्त्वाच्या विचारपीठावर राबत्या शेतकऱ्याचा, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मुलगा म्हणून अनुभवलेलं भावविश्व व्यक्त करताना आनंद वाटेल. शेतकरी चळवळीचा, साहित्याचा अभ्यासक, समीक्षक म्हणून शेती, शेतकरी चिंतन मांडण्याची संधी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपले पुनश्च धन्यवाद. यशस्वी संमेलनाच्या आयोजनास खूप साऱ्या मनस्वी शुभेच्छा !
प्रा. डॉ. ज्ञानदेव राऊत,
लातूर.
*********
मा. प्रा. डॉ. ज्ञानदेव राऊत,
लातूर
सप्रेम नमस्कार,
आपण आमच्या विनंतीला मान देऊन संमेलनाध्यक्षपदाचा स्वीकार केला याबद्दल अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार!
- गंगाधर मुटे