१४ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, महाबळेश्वर
दिनांक : शनिवार, दि. २१ व रविवार, दि. २२ फेब्रुवारी, २०२६
स्थळ : युगात्मा शरद जोशी विद्यानगरी,
स्वराज्य मुकुटमणी, प्रतापगड परीसर
स्वराज्य मुकुटमणी, प्रतापगड परीसर
दाभे मोहन, महाबळेश्वर, जि. सातारा
महत्त्वाचे निवेदन :
1. नियमित साहित्य संमेलन आणि प्रवासी साहित्य संमेलन या दोन संकल्पना एकाच साहित्य संमेलनात राबवणे शक्य नाही कारण दोन प्रकारच्या कार्यक्रमाचे आपण नियोजन करू शकत नाही.
महत्त्वाचे निवेदन :
1. नियमित साहित्य संमेलन आणि प्रवासी साहित्य संमेलन या दोन संकल्पना एकाच साहित्य संमेलनात राबवणे शक्य नाही कारण दोन प्रकारच्या कार्यक्रमाचे आपण नियोजन करू शकत नाही.
2. फेब्रुवारी महिन्यात जवळजवळ बहुतेक प्रतिनिधींना सुट्ट्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे प्रवासी साहित्य संमेलन एप्रिल किंवा मे या महिन्यातच घेणे योग्य आणि सोयीचे राहील, अशा निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत.
3. त्यामुळे प्रवासी साहित्य संकल्पना तात्पुरती स्थगित करून महाबळेश्वरचे संमेलन नियमित स्वरूपाचे घ्यावे असा विचार झाला आहे.
4. नियोजित संमेलन निसर्गरम्य परिसरात आयोजित होत असल्याने तेथे मुक्काम, निवास, शौचालय व्यवस्था वगैरे करावी लागणार आहे. त्यामुळे मोजक्या प्रतिनिधींचे संमेलन घेणे अनिवार्य आहे.
5. मोजक्याच प्रतिनिधीचे संमेलन असल्याने सर्वच्या सर्व प्रतिनिधी संमेलनात उपस्थित असणे आवश्यक आहे अन्यथा तयारीसाठी केलेला खर्च व्यर्थ जातो. सर्वसाधारणपणे एका प्रतिनिधीवर संस्थेला सहा हजार रुपयांच्या आसपास खर्च करावा लागेल. त्यामुळे ज्यांनी नोंदणी केली ते सर्व प्रतिनिधी हजर असणे आवश्यक आहे. एवढ्या एका कारणाने यावेळेस नोंदणी शुल्क कमीत कमी ₹ 500/- (रुपये पाचशे) असणे आवश्यक ठरणार आहे. नाईलाजाने तसा निर्णय घेण्यात आला आहे.
सहकार्य अपेक्षित आहे!
प्रतिनिधी नोंदणी पद्धत 
https://baliraja.com/rep-regd
कार्यक्रमपत्रिका 
https://baliraja.com/kp14
नियोजन 
https://baliraja.com/14-Ni
- गंगाधर मुटे
संस्थापक अध्यक्ष
अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ
