नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शिक्षेस तू भोगावया केले न काही पाप रे
जन्मास शेतकऱ्या तुझ्या आहे कुणाचा शाप रे
जन्मासवे तुज भोगण्या दिधला कुणी वनवास हा
पक्षापरी जगणे तुझे मरणे तुझे चुपचाप रे
धंदा तुझा आहे कसा चाऱ्याविणा पिल्ले तुझी
वाटा तुझा ना मागशी आहे कसा तु बाप रे
आहे जरी समता इथे किंमत तुला पाण्यापरी
मोजावया उंची तुझी का वेगळे हे माप रे
सत्ता किती येती नव्या पण औषधे आहे जुनी
जगण्यास दे ही यंत्रणा आश्वासनाची थाप रे
वेढ्यामधे अडतो सदा शेतातला हा माल का
पाहूनिया त्या संकटा सुटतो जिवा थरकाप रे
ते दंशल्यावर पलटती हे पलटल्यावर दंशती
मागे पुढे जाशी कुठे आहे दुतोंडी साप रे
भाषा तुझी देवास त्या कळलीच ना आतावरी
ही मंदिरे नाही तुझी करशी किती तू जाप रे
वृत्त ~ मंदाकिनी
लगावली: गागालगा गागालगा गागालगा गागालगा
प्रतिक्रिया
बढिया
वाह वा
Pradip
प्रतिसादाबद्दल
धन्यवाद थुल साहेब!!!!!
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने