तू कोसळ मुसळधार, जशी हवी तशी, कुठेही, कशीही
मी ओढ्याच्या रुपात, सावरेन तुला, बाहूत घेऊन
=-=-=-=-=
प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉 https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉 https://baliraja.com/form/wf-rep-16sss
कार्यक्रमपत्रिका 👉 https://baliraja.com/kp16
***************
=-=-=-=-=
बळीराजावरील विनोदी लेखन
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
खाते बनवा आणि लॉगिन करा
| प्रकाशन दिनांक | लेख/कविता/गझलेचे शीर्षक | वाचनसंख्या | प्रतिसाद संख्या | साहित्य प्रकार | अंतिम अद्यतन |
|---|---|---|---|---|---|
| बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ | 26,349 | 4 | रानमेवा | 4 years 3 months | |
| पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ | 44,222 | 8 | रानमेवा | 4 years 3 months | |
| पराक्रमी असा मी | 17,264 | 1 | रानमेवा | 4 years 4 months | |
| भाषेच्या गमती-जमती : भाग-२ | 13,047 | 1 | माझे गद्य लेखन | 8 years | |
| भाषेच्या गमती-जमती : भाग-१ | 11,499 | 1 | माझे गद्य लेखन | 8 years | |
| पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका | 14,399 | 5 | नागपुरी तडका | 8 years | |
| मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! | 11,223 | 3 | माझी कविता | 9 years 8 months | |
| अशीही उत्तरे-भाग- १ | 21,876 | 3 | माझे गद्य लेखन | 10 years 4 months | |
| शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) | 9,115 | 2 | माझी मराठी गझल | 12 years | |
| उद्दामपणाचा कळस - हझल | 9,018 | 2 | माझी मराठी गझल | 12 years 8 months | |
| कापला रेशमाच्या सुताने गळा | 32,427 | 1 | माझी मराठी गझल | 12 years 8 months | |
| अशीही उत्तरे-भाग-३ | 17,289 | 1 | माझे गद्य लेखन | 13 years 7 months | |
| अशीही उत्तरे-भाग - २ | 15,268 | 1 | माझे गद्य लेखन | 13 years 7 months | |
| 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत | 4,643 | 0 | माझी कविता | ||
| राखेमधे लोळतो मी (हजल) | 7,976 | 0 | माझी मराठी गझल | ||
| मग हव्या कशाला सलवारी | 10,286 | 0 | रानमेवा | ||
| छातीचं झाकण बोम्लीवर आलं | 11,378 | 0 | रानमेवा | ||
| मांसाहार जिंदाबाद ...!! | 16,629 | 0 | रानमेवा | ||
| आंब्याच्या झाडाले वांगे | 11,439 | 0 | रानमेवा |
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
| शीर्षक | वाचनसंख्या |
|---|---|
| पोळ्याच्या झडत्या | 218,101 |
| माझे फेसबूक स्टेटस-1 | 181,053 |
| शुभारंभ | 134,971 |
| रानमेवा - भूमिका | 109,399 |
| नागपुरी तडका - ई पुस्तक | 107,524 |
| आजचे शेतमालाचे बाजारभाव | 93,686 |
| सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता | 87,553 |
| कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! | 83,061 |
| भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा | 79,641 |
| उद्देश आणि भूमिका | 77,655 |
| विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह | 74,090 |
| विचारपूस | 71,897 |
| गणपतीची आरती ॥३५॥ | 67,898 |
| सत्कार समारंभ : वर्धा | 66,752 |
| शेतकरी संघटना लोगो, बिल्ला | 63,369 |
| किती चाटणार भारतपुत्रा? | 62,051 |
| जात्यावरची गाणी | 56,056 |
| माझे फेसबूक स्टेटस - 2 | 50,103 |
| महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात | 47,092 |
| हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। | 46,444 |
संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९ ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन. नियमावली
Copyright © Baliraja.Com - All rights reserved
Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini
कवी शेती करत नाही
admin
कवी शेती करत नाही
केली तर पिकत नाही
पिकली तर विकत नाही
विकली तर भाव नाही
भाव नाही तर नाव नाही
नाव नाही तर पत नाही
पत नाही तर प्रतिष्ठा नाही
मग तो शेतीशी द्रोह करून
राजाश्रय घेतो
आणि पेश करू लागतो
एकसे बढकर एक
अप्रतिम, भन्नाट
शोषकांना पोषक अशा
पोटभरू कवितांचा
नजराणा.....!!
कुणाचे कुणाला कळेनाच काही
गंगाधर मुटे
कुणाचे कुणाला कळेनाच काही
सभा होय ही की असे मद्यशाळा
© गंगाधर मुटे २५/०२/२०२४ #थेट_बांधावरून
गारपिटीच्या अंगसंगाने
गंगाधर मुटे
गारपिटीच्या अंगसंगाने गर्भपातल्या रानी
अश्रू होऊन हवेत विरले पाटामधले पाणी
. - गंगाधर मुटे ’’अभय”
03/10/2024
गंगाधर मुटे
तपवून शब्दधारा मग शब्दयज्ञ केला
बघताच शब्दाशक्ती जळ लागले जळाया
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो
02/10/2024
गंगाधर मुटे
काही हशील नाही जागे करून आता
मरणार हे तसेही खंगून जीर्ण काया
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो
02/10/2024
गंगाधर मुटे
स्वस्तात मागते जी आलू , लसूण, कांदा
तीही तयार नाही अजिबात 'भाव' द्याया
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो
02/10/2024
गंगाधर मुटे
सत्यापरीस वरचढ झालीय लोभमाया
कोणी तयार नाही सोज्वळ साक्ष द्याया
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो
30/09/2024
गंगाधर मुटे
आयुष्य थोडके अन् गंतव्य लांब आहे
होणार साध्य काही की जाणार जन्म वाया?
#गंगाधर_मुटे #शुभरात्री_लोक्सहो #रानातला_शेर
29/09/2024
गंगाधर मुटे
मी हारलो युगात्म्या वस्तीत पांगळ्यांच्या
बसलो उगीच होतो आयुध तुझे विकाया
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो
28/09/2024
गंगाधर मुटे
लाचार एक झाले, घनघोर बंड केले
घडले असे कधी तर कळवा मला कळाया
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो
27/09/2024
गंगाधर मुटे
उत्तेजना अशी तू देऊ नकोस वाऱ्या
मी पंख कापले बघ, माझ्यात मी स्थिराया
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो
07/10/2024
गंगाधर मुटे
गोंजारल्या भुकेला लाडात पोसले तर
दिसताच कंच चारा अक्कल निघे चराया
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो
कधीतरी आपल्याच आत झाकून बघू
गंगाधर मुटे
कधीतरी आपल्याच आत झाकून बघू
गरिबी का आली ते तरी शोधून बघू
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो
आयुष्य म्हणजे पेंडूलम,
गंगाधर मुटे
आयुष्य म्हणजे पेंडूलम, दोलायमानी मॅच असते
कधी मीलरचा सिक्सर तर, कधी सूर्याची कॅच असते
#गंगाधर_मुटे #रानातला_शेर
28/10/2025
गंगाधर मुटे
मोह-मायेला कवटाळून बघावं म्हणतो
आता थोडंस स्वतःसाठी जगावं म्हणतो
- गंगाधर मुटे #शेर #शुभरात्री_लोक्सहो
अस्तित्वाचे उभार खचले, मलूल
गंगाधर मुटे
अस्तित्वाचे उभार खचले, मलूल असल्यावाणी
जगण्या-मरण्या मधले अंतर, उरले नसल्यावाणी
- गंगाधर मुटे
काय करावे? पुढे जगावे? अथवा बस्स करावे?
प्रश्नापोटी प्रश्न जन्मले, उत्तर फसल्यावाणी
- गंगाधर मुटे
शिकारबोड्या शब्दशराने, काळिज पाणी पाणी
घाव विषारी घट्ट चिकटला, रुतून बसल्यावाणी
- गंगाधर मुटे #रानातला_शेर
प्रश्नामागून प्रश्नच प्रश्न, प्रश्नापुढेही प्रश्न
प्रश्न पिडेचा जणू चंग हा, कंबर कसल्यावाणी
- गंगाधर मुटे #रानातला_शेर
वेळच आली जर का बाका, गध्यास म्हण तू काका
"रोटी-बेटी की बात" नको, नातं जडल्यावाणी
- गंगाधर मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो
कोण जाणे खेळ नियतीचा, की
गंगाधर मुटे
कोण जाणे खेळ नियतीचा, की तुझेच नशीब फुटेल
नकोस करू अन्याय इतका, की कुणी बंड करून उठेल
© गंगाधर मुटे