Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




प्रतिनिधींचे मनोगत आणि अभिप्राय : 12sss

प्रतिक्रिया

  • Ajit1980's picture
    Ajit1980
    रवी, 10/08/2025 - 10:25. वाजता प्रकाशित केले.

    शेतकरी साहित्य संमेलनाचा गौरवशाली इतिहास. लेखनीला मिळालेला सन्मान नव्हे युगानयुगे दबलेला शेतक-यांचा आवाज, हुंकार या व्यासपीठाने , संमेलनाने मिळवून दिला. शेतक-यांप्रती समर्पित असलेले एकमेव साहित्य संमेलन यामागे आदरणीय मुटे सर व त्यांच्या संपूर्ण टीमचे कुशल व शिस्तबध्द नियोजन आहे.
    १२ वर्षाची अविरत सेवेची फलश्रुती....एक यशस्वी तप

    - अजित सपकाळ

  • ravindradalvi's picture
    ravindradalvi
    रवी, 10/08/2025 - 10:28. वाजता प्रकाशित केले.

    साहित्य विश्वात आपलं वेगळेपण जपत, भूमिका घेणारी वास्तवाची जाणीव जागृती करून देणारी, ही फक्त संमेलने नाहीत तर या सर्वांगिक सर्वकष शेतीनिष्ठ कार्यशाळा ठरलेल्या आहेत.. आम्ही या कार्यशाळेतूनच शेतीचे वास्तव समजून घेऊ शकलो. आमच्यापरिने लिहू शकलो, बोलू शकलो.
    मनापासून धन्यवाद मुटे साहेब!

    - रविंद्र दळवी

    रवींद्र अंबादास दळवी
    नाशिक

  • दिवाकर जोशी's picture
    दिवाकर जोशी
    रवी, 10/08/2025 - 10:33. वाजता प्रकाशित केले.

    एक आपुलकीचा अविस्मरणीय सोहळा

    दि. ८ व ९ फेब्रुवारी रोजी जयसिंगपूर जि. कोल्हापूर येथे बारावे अखिल भारतीय शेतकरी संमेलन जेष्ठ शेतकरी नेत्या माजी आमदार सरोजताई काशीकर यांच्या अध्यक्षतेखाली, माजी आमदार वामनराव चटप यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वागताध्यक्ष माजी मंत्री आ.राजेंद्र पाटील यड्रावकर आणि कार्याध्यक्ष मा.गंगाधर मुटे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात संपन्न झाले.
    उद्घाटन सोहळा, शेती संबंधित विषयांवरील तीन परिसंवाद, शेतकरी कविसंमेलन, बक्षिस वितरण, दिव्यांग कलाकारांच्या सुश्राव्य गायनाने सादर झालेले शेतकरी भक्ती प्रभात आणि शेतकरी गझल मुशायरा अशा भरगच्च कार्यक्रमांमुळे तसेच उत्कृष्ट निवास व भोजन व्यवस्था यामुळे हे संमेलन अगदी अविस्मरणीय ठरले.
    यातील शेतकरी गझल मुशायऱ्याचे अध्यक्षपद भुषविण्याचा सन्मान मला दिल्याबद्दल मी आदरणीय मुटे सर आणि संमेलन आयोजन समितीचा अंतःकरणातून ऋणी आहे.

    - दिवाकर जोशी (परळी वै)

    दिवाकर जोशी

  • Sayrabanu Chougule's picture
    Sayrabanu Chougule
    रवी, 10/08/2025 - 11:42. वाजता प्रकाशित केले.

    सर्व फोटो पाहून कार्यक्रम सुंदरच झाला आहे हे लक्षात येते.
    भव्य हॉल
    सुंदर बैठकव्यवस्था
    चकचकीत बस
    रेखीव रांगोळी
    सुंदर भारतमाता देखावा
    ग्रंथदिंडी
    अनेक मान्यवरांची उपस्थिती

    खूपच सुंदर आणि भव्यदिव्य असा कार्यक्रम झाला. काही अपरिहार्य कारणामुळे मला कार्यक्रमात सहभागी होता आले नाही याची सर्व फोटो पाहून मला चुटपुट लागून राहिली आहे. पण यापुढील सर्व शेतकरी साहित्य संमेलनात सहभागी व्हायचा निर्धारच करून टाकला आहे.

    शेतकरी या जिव्हाळ्याच्या विषयावर माझ्या पहिल्याच कवितेला सन्मानीत केल्याबध्दल आयोजकांचे खुप खुप आभार

    सन्मानचिन्ह खूपच सुंदर
    गंगाधर मुटे सरांचे आयोजन, नियोजन खूपच सुंदर
    आयोजक टीमचे हार्दिक अभिनंदन

    मुटे सरांच्या यशस्वी धडपडीला सलाम

    शेतकरी चळवळीची नवीन सदस्य
    लेखिका तथा कवयित्री
    सायराबानू चौगुले ,माणगाव, रायगड

  • आदिनाथ ताकटे's picture
    आदिनाथ ताकटे
    रवी, 10/08/2025 - 11:45. वाजता प्रकाशित केले.

    नेहमी प्रमाणे उत्कृष्ट नियोजन, स्वादिष्ट, चवदार जेवण, राहण्याची उत्तम व्यवस्था...संगीतमय सुप्रभात
    अजून काय हवंय...? फक्त उपस्थिती कमी असल्याची खंत...
    मा. गंगाधरजी मुटे सर आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांना समर्थपणे साथ देणारे ऍडव्होकेट बोरुळकर साहेब
    या सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद!

    - डॉ. आदिनाथ ताकटे

  • Sanjay Thakre's picture
    Sanjay Thakre
    रवी, 10/08/2025 - 12:45. वाजता प्रकाशित केले.

    स्वास्थ्य कारणांमुळे गेली दहा पंधरा दिवसांपासून मोबाईल वापर कटाक्षाने टाळला! मी थोडे उलट केले, काहींचा आजारी असताना मोबाईल वापर वाढतो......
    वाटस्अप् उघडून आपल्या गृपवर आल्याआल्या शेतकरी साहित्य संमेलनाचे चैतन्य पाहून मन रोमांचित झाले आणि सामिल होण्यासाठी निघालेल्या बांधवांचा हेवा ही वाटला. सरांची धावपळ, प्रचंड दगदग, मेहनत पाहून नतमस्तक व्हावेसे वाटले.

    हा माणूस इतकी उर्जा कुठून मिळवत असेल असा प्रश्न पडला...

    सहभागी होण्यासाठी निघालेल्या साहित्यिकांचे चॅटिंग पाहून उगाचच सातव्या किंवा आठव्या इयत्तेत असताना मराठी विषयातील "आतले आणि बाहेरचे" हा धडा आठवला! त्याचे लेखक बहुतेक वि.स.खांडेकर आहेत, पण् नक्की आठवत नाही. हे सहभागी सारें आतले आणि मी बाहेरचा अशी हुरहूर लागून राहिली. पण् संमेलनाचा आनंद ही आहेच.... न जाता येण्याचं दुःख आणि संमेलनाचा हर्ष अशी मनाची फार विचित्रच स्थिती आहे....!

    संमेलनाचे युट्यूबवर लाइव्ह प्रक्षेपण असेल तर ते पाहता येईल. ती लिंक गृप वर शेअर होईल ही अपेक्षा आहे...!

    सर्व सहभागी साहित्यिक बंधूंना संमेलनासाठी हार्दिक शुभकामना!

    - संजय ठाकरे
    मु. जनुना जि. वाशीम

  • पाने