नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
रंगताना रंगामध्ये
यमुनेच्या तिरावर, आवळीच्या झाडावरी
दडुनिया बसला गं, नटवर गिरिधारी
पाहुनिया राधिकेला, गुपचिप कान्हा आला
घेऊनिया पिचकारी, नेम धरितो मुरारी
सोडीयेली धार कशी? सररररर
रंगताना राधा बोले अररररर
बावरता राधा पळे, असे कान्हुला तो छळे
तरी चुकेचिना लळे, सावळ्याच्या चाळ्यामुळे
मग राधा करुणेने, बोलू पाहे केविलवाणे
रंगलेले रूप म्हणे, आहे मला घरी जाणे
आतातरी थांब ना रे…..!
कान्हा, आतातरी थांब ना रे…..!
अरे थांब गिरिधारी नको मारू पिचकारी,
रंगामध्ये भिजविशी किती रे मुरारी …।।धृ०।।
माळ तुटली कशी? मोती गळले कसे?
कंकण टिचकून हातात रुतले कसे?
कसे ना मला आज कोडे सुटे?
ऐसेकैसे तरंग मनाशी उठे?
मनाशी उठे! मनाशी उठे!!
अरे सांग गिरिधारी केली काय जादूगिरी?
रंगामध्ये न्हाऊनिया का हसतो मुरारी? …।।१।।
हातून सुटली कशी? घागर पडली कशी?
खोल पाण्यात जाऊनी बुडली कशी?
डोईवरचा पदर खांदी आला कसा?
रंगी रंगताना रंगात रंगला कसा?
रंगला कसा! रंगला कसा!!
अरे सांग गिरिधारी केली काय चमत्कारी?
रंगामध्ये भिजवली साडी चोळी सारी …।।२।।
रासलीला कशा? तुझे रंग कसे?
सार्या गोकुळी आमुचे झाले हसे
रोज येते अभय पाणी भरण्यामिषे
तुझ्याप्रितीचे अजब बुलावे कसे?
बुलावे कसे? बुलावे कसे?
अरे थांब गिरिधारी झाली पुरी प्रितखोरी
रंगामध्ये भिजुनिया तू कोरडा मुरारी …।।३।।
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रिया
होळीच्या हार्दीक शभेच्छा!
होळीच्या हार्दीक शभेच्छा!
शेतकरी तितुका एक एक!
होळीच्या हार्दीक शुभेच्छा...!
होळीच्या हार्दीक शुभेच्छा...!
शेतकरी तितुका एक एक!