![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
ती....
काळ्या मातीत खुरपतांना,
लुगड्याचा पदर डोक्यावर सावरत,
मधेच आभाळाकडे जायची तिची नजर
कपाळावर गडद चिंतेच्या रेषा,
त्याहून गडद डोळ्यांतली निराशा...
मग कधीतरी क्षितिजावर दिसायची
काळी किनार पावसाळी ढगांची
वाजत-गाजत यायची स्वारी
वर्दी देत मृगाची...
पहील्या सरीसवे तिची
चिंता पण जायची ओघळून
हिरवे रान, हिरवे स्वप्न
डोळ्यांत रहायचे आकळून
जित्रांपाचे खाणे, जित्रापाची धार
जित्रांपांना पाणी कोन दावनार?
सकाळी बाहेर नेऊन परत
गोठ्यात कोन आणणार?
तिन्ही ऋतू तिन्ही काळ
तिचे चक्र घरघरायचे
ती म्हणजे शेत, ती म्हणजे घर
ती म्हणजे ...सर्वकाही!
....आता फोटोतली 'ती' पहाते टूकुटूकु
शेतात तण माईना, पिकाला पाणी कोन देईना
भाऊबंदकी शिरली घरात मागल्या दाराने
उतरल्या भिंंती चौ-अंगाने
जित्राप केविलवाणी २४ तास गोठ्यात
सगळेच आहेत आता आपापल्या ताठ्यात
फोटोतल्या फोटोत ती उसासते
भकास नजरेने पहात रहाते,
दिसत नाही आता नजरेला
क्षितिजावरचा पावसाळी मेघ
दिसते भेगाळलेली काळी भुई
अन्...सात-बारावरची रुंदावणारी रेघ!!!
--विनिता माने- पिसाळ
पुणे
प्रतिक्रिया
हम्म
सात-बारावरची रुंदावणारी रेघ!!!
शेतकरी जीवनातीचा पैलू उलगडणारी कविता. सुरेख उतरलीय
* * *
जित्राप हा शब्द बर्याच दिवसांनी ऐकायला मिळाला. आमच्याकडे जुन्या पिढीकडून हा शब्द ऐकला होता.
धन्यवाद विनिताजी.
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद सर
धन्यवाद सर
माझ्या मावशीवरुन हि कविता लिहीली गेली.
वा
तरळत गेले चित्र डोळ्यासमोरून.....
हेमंत साळुंके
अभिनंदन.
अप्रतीम रचना. स्पर्धेतल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन.
http://maymrathi.blogspot.com/
वाहवा
विनिताजी,
अतिशय सुरेख आणि भावनिक अशी तुमची ही कविता झाली आहे.
तुम्ही खूप छान लिहिता...
धन्यवाद.
रविंद्र कामठे, पुणे.
आपला विश्वासू,
रविंद्र कामठे
पुणे
भ्र. न. ९८२२४ ०४३३०
इमेल – ravindrakamthe@gmail.com
पाने