नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
नीसर्गाची थट्टा
जवा दिसल दाण टपोर्या डोळ्याच,
तवा वाटल कौतीक जस वाटे पोटच्या गोळ्याच.
आजवरी होतो मी जीव धरून मीठीत,
बघता पीकाला मग घेतल मीठीत.
वार्यासंगे उडत पात तोंडावर पडे,
मायेच्या प्रेमाचे वाहत होते वडे.
नजर संपेस्तोवर होत सार हीरवगार,
आनंद माझा गेला गगणा आरपार.
डोळ्याम्होर दिसल पोरीच लगीन,
पोराच शीक्षण अन् बायकोच दागीन.
तेवढ्यात तोंडावर एक सर बरसली,
डोळ उघडल माझ नी नीसर्गाची थट्टा दिसली.
फीरवल डोळ सार्या आवारात,
दाण नव्हत फुटल कुटच शीवारात.
थेंब पडुन अंगावर त्यान घाम माझा जीरवला,
बीज जळल आधी मग पाऊस मीरवला.
सपान रचुन खोट पावसा तु जाळलीस पीकदानी,
बस फीरवत आता गाडगभर मड्याभोवती रे पाणी.
प्रज्ञा आपेगांवकर.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने