नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकऱ्याचा गळफास
एक म्हणे झुनका भाकर ,
दुजा म्हणे मुलांना सकस आहार
दोघेही शेतकऱ्याला लुटती ,
तेच सर्वांना वाटती !
शेतकरी झाला लाचार , कर्ज बाजारी,
म्हणे आणून घ्या लटकायला दोरी !
मुले शिक्षण सोडूनी घेई कटोरी ,
शासनाने केले मालकाचे पोर भिकारी !
पुढारी म्हणे देशाचा नागरिक स्वाभिमानी व्हावा ,
कर्म उलटे करुनी त्यातच घेई चावा !
तुट होती तेव्हा तुट केली ,
कोहळे काढुनी आवळ्याची सुत दिली !
शेतकऱ्या न कडे लुट ,
तो मागे सबसीडी –सुट!
उट सुट पुढारी घोषणा करी ,
हा एकता आस ठेओनि चौकावारी !
पुढारी झाले बंदर ,
पक्षात उद्या मरती सुंदर !
शासनात असता म्हणे शासनाचे ,
रिकामे होताच होई लोकांचे !
सांगे माझ्या सारखा मीच फौलाद ,
ऐकणारे म्हणे , हि तर सरड्याची औलाद !
ऐसा जाहला नेतृत्वाचा सत्यानास ,
म्हणोनी घेई शेतकरी गळफास !
दि. ल. भोयर
------------------------------------
प्रतिक्रिया
सरड्याची औलाद !
नेतृत्वाचा सत्यानास!! वाह काय कल्पना आहे!
हेमंत साळुंके
पाने