नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
देवा... वावरा कड़े जाशील,
तर माझा एक निरोप देशील..?
सांगशील त्या धरणी मातेला,
तुझ्या कृपेने, तुझे हे पोरं...
पोट भरत आहे,
आनंदाने नांदत आहे..!
कृपा आहे तुझी,
कशे फेडू हे ऋण..?
सांगशील त्या अन्नदाते ला,
आमच्या वर तुझी कृपा,
अशीच् राहू दे..!
विहिरी, तलाव, नदया,
तुझ्या मायेनी भरू दे..!!
आलेले संकट, आपल्या
सावलित असू दे..!!!
देवा... तू भिऊ नकोस्,
खचू ही नकोस्..!
कारण तू जर खचलास,
तर सारे जग उपाशी राहील..!!
मातेचं ममत्व,
मुलांसाठी कधीच्
कमी पडत नाही..!
मुलांकडून झालेल्या चुका,
आपल्या पदरी घे..!!
पुन्हा एकदा, कृषी क्रांती घडू दे,
पुन्हा एकदा, कोठया गोदमं भरू दे,
या वेळेस, मात्र झालेल्या चुका,
पुन्हा होणार नाही,
याची खंत असू दे..!
देवा... वावरा कड़े जाशील,
तर माझा हाच निरोप देशील,
हाच निरोप देशील..!!
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने