नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
राजकारणाचा बळी शेतकरी
कंपनीच्या खत बियाण्याची
कंपनी ठरवते किंमत
आमच्या मालाचा भाव ठरते
तीन टिकल्या जंमत
पिकलं शेत चांगल
अहो भाव कोण देते
पडून रायते माल
अन् रेला होते
कंपनेयले असते
सरकारचं पाठबळ
नाही शेतकऱ्यामागं कोणी
नुसतीच होरपळ
दुष्काळात भांडवल
जाते सारं मातीत
तुटपुंज्या मदतीची
सरकार हवा करते रातीत
शेतीचं उत्पन्न दुप्पट
करू सातबारा कोरा
आश्वासनाचा असते
निवडणूकीपुरता मारा
सत्तेच्या सिंहासनावर बसताच
कोणाले आठवत नाही वचन
शेतकऱ्यांचा बळी जातो
यांचे शाबूत वतन
आंदोलन केले की
मिळते गुलामासम वागणूक
खोटे शेतकरी म्हणून
होते सुरु छळवणूक
जीवंतपणी किंमत नाही
मेल्यावर येते मदत
आत्महत्येचं राजकारण
केल्या जाते सतत
कोणत्याच सरकारकडून
नाही मिळाला शेतकर्याला न्याय
पेटून उठू, किती पिढ्या
सोसायचा आणखी अन्याय
कवी
लक्ष्मण लाड
मु.पो बेनोडा ता.वरूड
जि. अमरावती
मो.९८५०५६९१३२
Email-laxmanlad76@gmail.com