नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
सैनिका... तू रक्षितोस,
मी कसतो काळी आई
सीमेवर तू..,अन मी
रानात शूर शिपाई..
तुझीही निधडी छाती
शत्रूच्या झेलते गोळ्या,
माझेही युद्ध चालते
येता दुष्काळाच्या टोळ्या
राखण करतोस तू
जागून दिवसा राती,
मीही पोसतो देशाला
ही कसून काळी माती
कोसळतो अचानक
भाव चढता चढता,
स्वातंत्र्यात शहिद मी
होतो लढता लढता
सरणासंगे सरते
माझी समर कहाणी,
शेतात झाड उरते
बलिदानाची निशाणी
आता माझी नवी पिढी
विद्रोही व्हायला हवी..,
नांगरासंगे हातात
बंदूक घ्यायला हवी...
- आत्तम गेंदे, परभणी
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
मनापासून धन्यवाद सरजी
मनापासून धन्यवाद सरजी
खूप छान कविता !!!!
अप्रतिम सरजी!!!!*congrats*
पाने