नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
(विश्वस्तरीय लेखन स्पर्धा २०१५)
:::::::: शरद जोशी :::::::
श-तकोटीतून एक जन्मला वीर तो
शेतकऱ्यांसाठी सदा लढला वीर तो
शेतकरी संघटना करूनी स्थापन
शेतकऱ्यांपाठी उभारला खंबीर तो.....
र-क्त आटवतो,देह झिजवतो वीर तो
धर्म शेतकऱ्यांचा जागवतो वीर तो
नका होऊ लाचार,नका होऊ भिकारी
पिचलेल्या शेतकऱ्यांना देतो धीर तो......
द-शा बळीराजाची संपवतो वीर तो
व्यवस्थेला पायाशी लोळवतो वीर तो
बुळबुळीत आश्वासनांना धिक्कारुनी
शब्दतलवारीने उडवितो शीर तो.....
जो-मात यशाकडे झेपावला वीर तो
स्फुल्लिंग भरतो आंदोलनाला वीर तो
कुशल त्या सारथ्यांना घेऊन सोबती
वर्मावर व्यवस्थेच्या सोडतो तीर तो.....
शी-णला लढून लढून आज वीर तो
प्रेरणा नव्या दमात भरतो वीर तो
तयार आम्ही उचलण्या या खांद्यावरी
अथांग निष्ठेने चळवळीचा भार तो...!
©अनिल सा.राऊत
9890884228
प्रतिक्रिया
अभिनंदन
अभिनंदन
पाने