![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*फुलू दे शिवारी*
फुलू दे शिवारी सदा पांडुरंगा
लतावृक्ष सारे तुझ्या रे अभंगा
सुरांनी अशी ही मनी ओढ दयावी
तुझ्या आठवांची फुले पांघरावी
सरी पावसाच्या असे मी भिजावे
हरी नाम ओठी सदा मी वदावे
शमावी व्यथा ही अशी गारव्याने
तुझ्या लेकराला पहावे दयेने
दयाळू कृपाळू असे थोर कांता
जिवाला तुझी आस मोठी अनंता
सदासर्वदा तू जगी रे दिसावा
तुझा तो कधीही न भासो दुरावा
*डॉ. राजेंद्र अशोक गवळी*
कुकाणा ता. नेवासा
जि. अहमदनगर ४१४६०४
मोबा.नं. ९८८१७१६९८९
प्रतिक्रिया
अप्रतिम
अप्रतिम
Dr. Rajendra Gawali
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
पाने