१२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर
एक सुखद साहित्यिक अनुभव
कोणत्याही साहित्य संमेलनाची उत्सुकता असतेच आणि एक पुरस्कार विजेता,निमंत्रित कवी, गझलकार साहित्यिक म्हणून जेव्हा निमंत्रण येतात तेव्हा एक वेगळाच आनंद, हवासा तो ... क्षण असतो. जाण्याचा आणि तेथील वातावरणात समरस होऊन परिस्थितीनुसार कविता गझल सादरीकरणाचा एक वेगळाच अनुभव आणि थोडंसं दडपण पण असतं,,, परंतु जेव्हापासून अर्थ प्रबोधिनी आयोजित शेतकरी साहित्य संमेलनात जोडलो गेलो तेव्हापासून शेतकरी साहित्य संमेलन म्हटलं की एक आपुलकीची साहित्यिक भावना मनात घर करून असते आणि या दरवर्षी येणाऱ्या आतुरतेने क्षणाची वाट बघत असतो. एक आपलंसं वाटणारं जिव्हाळ्याचं साहित्य संमेलन म्हणजे शेतकरी साहित्य संमेलन हे एक माझ्या साहित्यिक जीवनामधील आतापर्यंत तरी अविभाज्य भाग झालेला आहे, सतत राहील अशी आशा, आयोजकांना विनंती पण आहे.
विश्वस्तरीय ऑनलाईन काव्य लेखन स्पर्धा ते प्रत्येक वर्षी आयोजित अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन ही माझ्यासारख्या साहित्यिकांना आणि खास करून मला एक साहित्यिक पर्वणी,आणि साहित्य सेवा असते हे मी ठामपणे सांगतो. त्याच्या मागचं कारण असं की शेतीमाती हा विषय अतिशय महत्त्वाचा तेवढाच गंभीर आणि आपुलकीचा विषय आणि या विषयावर आपण लिहिलेलं दरवर्षी वेगवेगळे लिहिलेले साहित्य, शेतकरी साहित्य संमेलनातून प्रेक्षकापर्यंत मांडण्याचं अहोभाग्य आम्हाला आयोजक श्री गंगाधरजी मुटे सर करून देतात आणि त्यांच्या बरोबरीने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आयोजकां सोबत आम्हाला व्यक्त होतं आहोत,, यथोचित सन्मान करून आम्हाला सन्मानाने बोलवल्या जाते, आमचं साहित्य प्रस्तुत करता येतं आमचे विचार मांडता येतात हे आम्हा नवं साहित्यिकांच अहोभाग्य आहे .आणि त्यातच स्पर्धेमध्ये भाग घेऊन गझल, कथा, कविता, गीत, समीक्षण, अनुभव कथन स्पर्धेमध्ये कविता सहभागी होऊन आम्हाला शेतकरी या विषयावर साहित्य लिहिण्याची जी संधी मिळते आणि ते लिहिताना आम्हा लेखकांना किती अभिमान वाटतो एक विशेष आनंद वाटतो की,, शेतकरी साहित्य संमेलना सोबत मी जुळलो आहोत त्याचा एक भाग आहो आणि एक छोटीशी का होईना शेतकरी शेतकऱ्यांची सेवा माझ्या हातून घडत आहे. एक विलक्षण सुखद आनंद घेऊन साहित्य लिखाणात भर पडते.
असेच या वर्षी दिनांक ८ ते ९ फेब्रुवारी २०२५ ला जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर येथे पार पडलेले १२ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन याचा तर अनुभव म्हणजे एक काही वेगळाच अनुभव या वर्षी आलेला आहे. आयोजक श्रीमान गंगाधरजी मुटे यांना लाभलेले स्वागताध्यक्ष मान. आमदार श्री राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, संमेलनाध्यक्षा मान. सरोजताई काशीकर, उद्घाटक मान. अँड. वामनराव चटप साहेब, विशेष अतिथी मान. संजय पाटील यड्रावकर साहेब आणि संयोजक मान. अँड. सतीश बोरुळकर साहेब. तसेच शरद कृषी महाविद्यालय यड्रावकर शिक्षण व उद्योग समूह जयसिंगपूर, कृषी क्षेत्रातील विशेष संमेलना लाभलेले सहकारी, शेती अर्थ प्रबोधिनी गंगाधर मुटे सर यांच्यासोबत हे साहित्य संमेलन म्हणजे एक विशिष्ट पातळीवर साहित्य सेवा घडावी असलेच अनुभव आले. साहित्य संमेलनाची तारीख कधी जवळ येते आणि आम्ही कधी ह्या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होतो अशा आनंदी मनाने मी, कवी एम ए रहिम "बंदी" चंद्रपूर, कवी रंगनाथ तालवटकर वर्धा, आम्ही साहित्य संमेलनाचा प्रवास सुरू करून या आनंदमय सोहळ्यात सहभागी व्हायला सुरुवात करताच असे काही सुखद क्षण, सुखद बातम्या आम्हाला आमच्या whats'app समूहावर आम्हाला नवीन नवीन सहकार्याच्या भावनेतून निरोप येत होते तेव्हा तर उत्सुकता आणखीच वाढली की, नियोजनबद्ध एवढी मोठी साहित्य सेवा करणारी मंडळी सुद्धा तिथे उपलब्ध आहे. रेल्वेच्या प्रवासात मिळालेला साहित्यिक गोतावळा, गझल गोतावळा त्यांचे आपुलकीचे प्रेमाचे बोल त्यांच्यासोबत केलेला संवाद हा कधीही न विसरणारा प्रवास घेऊन आम्ही जयसिंगपूरच्या साहित्य नगरीत पोहोचलो.
संमेलनाला येणाऱ्यांची चौकशी, जाण्या - येण्यासाठी विशिष्ट स्पेशल वाहनांची सोय. उतरताच आयोजकांनी नेमून दिलेल्या मान्यवर सेवाभावींचे शाब्दिक स्वागत त्यांचे मदतीचे हात. मुक्कामालग राहण्याच्या जागेपर्यंत आणि तेही अशा पवित्र ठिकाणी की जिथे मन अगदी प्रसन्न आणि प्रफुल्लित होऊनच निघते, तिथे वास्तव्याला असणाऱ्या साहित्यिकांच्या मनात एक निर्मळ कोमल आणि भक्तिमय भाव घेऊनच राहण्याच्या ठिकाणापासून ते साहित्य संमेलनाच्या ठिकाणापर्यंत जातानाप्र त्येक साहित्यिक पवित्र विचारातूनच साहित्य संमेलनाच्या स्थळी जात होता, याचा एक वेगळाच अनुभव तिथे घेता आला. संमेलनास पोहोचल्या पासून तर शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांनी आम्हा साहित्यिकांची सेवा केली त्या प्रत्येक सेवाभावींचे नावे तर माहीत नाहीत पण चेहऱ्याने आणि त्यांच्या स्वभावाने त्यांच्या बोलण्याने ते आयुष्यातून कधीही न विसरणारे चेहरे आम्ही तिथून घेऊन परतलो हे मात्र नक्कीच.
संमेलनाच्या गावाला उतरताच संमेलन स्थळापर्यंत पोहोचवण्याची एक विशिष्ट विशेष सोय आम्हांसाठी करण्यात आली. राहण्याच्या नियोजित स्थळा पासून संमेलनस्थळी पोहचविणे तिथून जेवणाच्या व्यवस्थे ठिकाणी पोहचविणे तिथून पुन्हा संमेलन स्थळी आणून सोडणे, संमेलनाची सत्र संपताच पुन्हा वास्तव्याच्या ठिकाणी आणून सोडणे ही व्यवस्थेसाठी तब्बल चार माणसे आमची वाट बघत उभे राहणे आलेल्या पाहुण्यांचे प्रेमळ शब्दाने शाब्दिक स्वागत करणे, प्रत्येकांची विचारपूस करणे मागे पुढे असणाऱ्या साहित्यिकांची वाट पाहणे इथपर्यंत साहित्यिकांची सेवा ही जयसिंगपुरच्या सेवाभावी मान्यवरांकडून आम्हाला अनुभवता आली. खरंच धन्य ते साहित्य सेवेचे हात आणि साहित्य सेवेचे मानकरी.
साहित्य सोहळा सुरू झाला... एक थोडीशी हळहळ मनात राहून गेली सुरुवातीची ग्रंथ दिंडी एक विलोभनीय प्रेक्षणीय आणि अतिशय उत्साह वातावरणात पार पडली तो क्षण आम्हाला अनुभवता आला नाही पण त्याची मिळालेली चाहूल त्याच्याबद्दल झालेली चर्चा ही एक उत्तम संधी आम्ही गमावली असं वाटलं पण वेळेअभावी शक्य झालं नाही प्रयत्न केला पण शेवट कार्यक्रमाची वेळ ठरलेली असते.... त्यानुसार ग्रंथदिंडी पार पडली आणि लगेचच सत्र सुरुवात झाले... ती प्रशस्त जागा,,, प्रेमळ बोलणारी माणसं. प्रशस्त संमेलन हॉल, संमेलन नियोजन पाहून असं वाटलं की हे आपल्या साहित्याला योग्य न्याय देणारं स्थळ, योग्य न्याय देणारी जीवाभावाची माणसं आपल्याला भेटली आणि त्यातच नवीन नवीन साहित्यिक, रसिक सुद्धा आपल्याला इथे दिसली.. आमच्या साहित्याचा सन्मान सुरुवातीपासूनच... सुरुवात झाला असं वाटलं.
स्वागत सोहळा,, शेतीविषयक प्रत्येक परिसंवाद, शेतीबद्दल प्रत्येक मान्यवरांचे भाष्य... पुढील शेतकरी साहित्य विषयावर साहित्य लिहिणाऱ्याला एक पर्वणीच ठरले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निमंत्रित आलेल्या कवींचे बहारदार आणि विषयाला अनुसरून साहित्यिकांच्या गर्दीत रसिक प्रेक्षकांच्या हजेरीत बहरत गेलेले कवी संमेलन. सादर झालेल्या कविता,, कवितेवर जिवापाड प्रेम करणारा कवितेचा गोतावळा त्यांच्या भेटी त्यात काही उल्लेखनीय कविता. कवी लक्ष्मणजी हेंबाडे भाऊसाहेब, रवींद्र दळवी भाऊ, लिलाधरजी दवंडे, राजेंद्रजी फंड सर, अजित सपकाळ, अनंत मुंडे सर, बालाजी कांबळे भाऊ, रंगनाथ तालवटकर भाऊ, एम ए रहीमजी, साईनाथ राहटकर, अंगाईतकरजी आणि खास आयोजक कवी बबनराव यादव सर, आणि एक विशेष आवडती आठवण म्हणजे फोटोग्राफर भाऊ. कवयित्री वनिता खेबूडकर, सुरेखा बोरकर मॅडम आणि इतर बरेच नामवंत कवी कवयित्री यांचा गोतावळा तिथे मिळाला, त्यांच्या कविता ऐकायला मिळाल्या हे तर माझ्यासाठी तरी समोरील लिखाणाची पर्वणी असते, असले कुठेही शिक्षण मी वाया घालवत नाही. प्रत्येकाला ऐकून, प्रत्येकाचं सादरीकरण पाहून समोरील वाटचालीस चालना मिळते ते,,, या प्रत्येक साहित्य सत्रातूनच मिळते असे मी ठामपणे सांगतो.
"विशेष व्यवस्था" ....आणि एक विशेष सांगायचं म्हणजे भोजन व्यवस्था सामाजिक सेवाभावी बांधिलकीतून जी भोजन व्यवस्था आयोजकांनी आणि समाजसेवी संस्थेने जी भोजन व्यवस्था केली ती कधीही विसरू शकणारी नाही असे मी ठामपणे सांगतो. रुचकर भोजन भोजनासोबत त्यांचा तेवढाच रुचकर सुसंवाद परिपूर्णतेची ढेकर आणि त्यासोबतच प्रत्येक घासांसोबत पोटात जाणारे प्रेमळ शब्द ... या संपूर्ण अशा आनंद आणि सुखमय वातावरणात आम्हासाठी तयार केलेले आणि प्रत्येकाला पोटभर आग्रहाने विनंतीतून केलेले सुग्रास भोजन हे कधीही विसरणार नाहीच.... तर शेवटी तेथील सेवाधारी हातांना आताही प्रणाम करावंसं वाटते... मी माझ्या शब्दातून माझ्या स्वभावातून त्या आयोजकांपुढे व्यक्त झालो, खरंच धन्यता मानतो अशा सेवाभावी संस्थेला, सेवाभावी लोकांना की,,, जे एवढ्या लांबून आलेल्या लोकांच्या सेवेमध्ये अविरत प्रयत्नशील होती आणि कुणीही माणूस इथे उपाशी जाऊ नये याची काळजी घेत होते. दोन दिवस मिळणाऱ्या प्रत्येक वेळीच्या जेवणामध्ये जो काही वेगळाच रुचकर आनंद आला त्याचे वर्णन शब्दात होऊ शकणार नाही,,, एवढं ते सेवाभावी काम. साहित्यिकाला काय काय हवं,,,काय नाही याची लहानसहान बाबींची चर्चा करणे समजून घेणे हे आम्हा साहित्यिकांसाठी बिगर साहित्यिकाकडून घडलेली सेवा म्हणजे आमच्या पेक्षाही ते एक मोठं काम तेथील आयोजित मंडळींनी आणि राबणाऱ्या प्रत्येक हाताने केलं... प्रत्येकाचं नाव माहीत नाही पण प्रत्येकाचे चेहरे स्वभाव आणि त्यांचे शाब्दिक रुचकर घास अजूनही आमच्या हृदयात घर करून आहे, तिथे असणाऱ्या प्रत्येक साहित्यिकांच्या आणि प्रत्येक पाहुण्यांच्या वतीने ठामपणे सांगतो...
त्यातच दुसऱ्या दिवशी सुप्रभाती सुसज्ज सोयीनिशी सर्व,, पुन्हा आदल्या दिवशीच्या सुखद अनुभवाने पुन्हा हवाहवासा दुसरा दिवस उजाडला... कारण एवढ्या सेवा भावनेतून प्रत्येकाला हवांहवांसा क्षण म्हणजे दुसऱ्या दिवशीचा संगीतमय कार्यक्रम त्याच्या पहिले आयोजकांनी अतिशय नम्रतेने आणि सेवाभावी वृत्तीने सकाळचा अल्पोपाहाराचा कार्यक्रम हा सुद्धा मनात घर करून आहे . राहण्याच्या ठिकाणापासून तर संमेलनाच्या स्थळापर्यंत संमेलनाच्या स्थळापासून तर नाश्त्याच्या ठिकाणापर्यंत असं कधीही वाटलं नाही की हे ठिकाण आमच्यापासून दूर आहे. प्रत्येक स्थळाला जोडणारे दुवे आमच्यासोबत होते आणि त्या दुव्यांनी आमचा जो सन्मान केला तो काही वेगळाच.
दुसऱ्या दिवशीच्या सत्रात सकाळीच एक अतिशय उत्तम पर्वणी म्हणजे सूरमही सुगम संगीताचा कार्यक्रम. अपंगत्व कुठे असते हो...! मानलं तर अपंगत्व असते, परिपूर्ण शरीर घेऊन सुद्धा माणसं अपंग असतो आणि शरीराचा काही भाग गमावलेली किंवा नसलेली माणसं सुद्धा परिपूर्ण असलेल्या मानव शरीरापेक्षा एक वेगळे विश्व निर्माण करू शकतं आणि त्याच विश्वाचा अनुभव आम्हाला सकाळच्या सुरमयी संगीत मैफिलीत झाला. कौतुकाचे शब्द कमी पडतील असे ते सुरेल गायन, वाद्यवृंद तसेच त्याला सहकार्य करणारा बोरुळकर परिवार... काय म्हणावं या परिवाराला साहित्य सेवा कशी असते त्यांचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही सुरमई सकाळ आणि ती सकाळ आम्हाला उपलब्ध करून देणारा तो धन्य तो परिवार.
त्यानंतर शेतकऱ्यावर... शेतमालाचे भाव आधारित शेतकरी गझल मुशायरा.... उत्सुकता तर होतीच पण थोडी मनात किंचित भीती सुद्धा होती महाराष्ट्रातील नामवंत गझलकार यांच्यासोबत गझल सादर करणे हा एक वेगळाच अनुभव इथे आला. या पहिलेही पुष्कळ असे गझल मुशायरे केले पण शेतकरी साहित्य संमेलनात विषयाला धरून सादर करणाऱ्या गझलांमध्ये एक विशेष आनंद तर असतो पण एक थोडं मनात काहीतरी असतं की आपण इथपर्यंत यांच्या मोठ्या मोठ्या नावाजलेल्या गझलकारापर्यंत आपलं शाब्दिक साहित्य शेतकऱ्यावर लिहिलेले साहित्य पोहोचेल काय,,, त्यातच महाराष्ट्रातील नामवंत मातब्बर गझलकार, रसिक श्रोते सूत्रसंचालन करणारे श्रीमान बाळासाहेब गिरी त्यांच्यासोबत बसून, सोबत आपापल्या गझल लेखन, सादरीकरण शैलीत पारंगत दिग्गज मान्यवर गझलकार मंडळी. माझ्या एका शेरात सजलेले गझलरत्ने यांच्यासोबत गझल सादर करणे म्हणजे एक प्रकारचा साहित्यिक मुकुटच असतो असे मला वाटते. आणि त्यातही माझ्या काही शेराने आणि सादर केलेल्या गझलेने एक विशेष परिपूर्ण आनंद आणि उपस्थितांचे मनोरंजनात्मक समज प्रबोधन शेरातून,, मनोरंजन आणि एक विशिष्ट शाब्दिक ठेवा त्यांच्यापर्यंत पोहोचणे यांतच मी धन्यता मानतो... काही गहिवरून आले काहींनी शाबासकीची थाप दिली काहींनी कुठचा आहे म्हणून चौकशी केली. असं लिखाण हे शेतीवर सुद्धा असे लिखाण होऊ शकतात. शेती हा विषय घेऊन विशिष्ट प्रकारे अतिशय महत्त्वपूर्ण विषय घेऊन गझल लिहिणे आणि ते सादरीकरण करणे साहित्यिक तसेच शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल या पद्धतीने सादरीकरण करणे हा एक विशेष अनुभव घेता आला. त्याला मिळणारी विविध सत्रातील उपस्थित साहित्यिक तसेच रसिक श्रोतागण यांच्यासमोर सादर केलेल्या गझलेला मिळालेली शाब्दिक शाबासकी,,, दाद सुद्धा तेवढीच महत्त्वाची ठरली. तो क्षण कधीही न विसरणारा आहे हे मात्र नक्की. तेवढीच महत्त्वाची ठरली एक अतिशय आनंदाचा क्षण, तो माझ्या साहित्यिक आयुष्यात घडला हे फक्त आणि फक्त आयोजक आणि माझ्या गझल व्यासपीठामुळे.
त्यानंतर शेवटचे सत्र म्हणजे बक्षीस वितरणाचा तसेच समारोपीय सत्र अगदी ठरलेल्या वेळेवर बक्षीस वितरण आणि समारोपाचे सत्र चालू होणार त्याच्या पहिले जयसिंगपूर मधील प्रमुख मान्यवर व्यक्तींनी सुद्धा आमच्यात उपस्थिती दाखवून गझल मुशायऱ्याला एका उंच पातळीवर नेऊन ठेवण्यास सहकार्य केले... गझलेत रमणीय झाले. त्यानंतर पारितोषिक वितरण आणि समारोपीय सत्र असा अतिशय छान सोहळा पार पडला त्यामध्ये शेती शेतमालाचे भाव या विषयाला अनुसरून विविध साहित्य लेखनाच्या प्रकारातून लिहिलेल्या साहित्याला त्यामध्ये मुक्तछंद कविता, पद्य कविता, गझल, कथा, सुखद अनुभव, पुस्तक परीक्षण आणि इतर हाताळण्यात येणाऱ्या साहित्य प्रकाराच्या विजेत्या साहित्यिकांना सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा सोहळा पार पडला. त्यामध्ये माझ्या "शेतमालाचे भाव" या गझलेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आणि नाव येताच पारितोषिक स्वीकारताना एक विशेष सुखात अनुभव मान्यवरांकडून आणि त्यांच्या शाब्दिक बोलण्यातून आला, त्याचा आनंद वेगळाच होता. इतर मान्यवरांनी मान्यवरांचे सुद्धा पारितोषिक वितरणामध्ये सहकार्य होते, प्रत्येक विजेत्या साहित्यिकाला योग्य तो न्याय देण्याचे काम आयोजकांनी केलं आणि तो असा हा संपूर्ण सोहळा मान्यवरांच्या मार्गदर्शनातून भाषणातून त्यांच्या अमूल्य विचारातून चालत राहिला... आणि शेवटी श्रीमान गंगाधरजी मुटे लिखित "शेतकरी गर्जन गीत" गायन करणे हा एक माझ्यासाठी नवीन सुखद अनुभव आला, हे मी माझं अहोभाग्य समजतो,,, की मला उत्तम गोड गळ्याची तालबद्ध लयबद्ध गायक विवेक मुटे यांच्यासोबत शेतकरी गर्जना गीत गायन करण्याचा सन्मान मिळाला हा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. अगदी अल्पावधीतच थोडंसं मार्गदर्शन आणि त्यांच्यासोबत गायलेले गीत हे माझ्यासाठी एक ऊर्जामयी ठरलं.
अशा पद्धतीने जयसिंगपूरचा साहित्य गोतावळा घेऊन परत निघताना मात्र खरंच हृदय भरून आलंय . दोन दिवस जे हात, साहित्यिक आणि सेवाभावी लोक, सेवाभावी विचार आमच्यासोबत जुळले त्यांना काही काळापुरतं सोडून येण्याचं धाडस होत नव्हतं... जयसिंगपूर जिल्हा - कोल्हापूरची साहित्य सेवा आमच्यासाठी तेवढ्यापुरतीच न राहता अखंड अशी एक साहित्य पर्वणी घेऊन तिथून निघताना मात्र आमची पाऊल जड झाली होती. थोड्या वेळापूर्वी झालेली ओळख ही येणाऱ्या सुखद भविष्यातील काळासाठी नक्कीच असते, या भावनेतून प्रत्येकाची आठवण हृदयात साठवून जयसिंगपूर सोडताना, जयसिंगपूरचे सेवाभावी हात सोडताना मात्र प्रत्येक साहित्यिकाच मन भरून आले असेल हे मी माझ्या वतीने ठामपणे सांगतो. आणि हा असाच साहित्यिक गोतावळा कुठे ना कुठे पुन्हा भेटतील या आशेने ...ही साहित्य सेवा अविरत सुरू राहावी त्यासाठी आयोजकांना संपूर्ण आयोजक टीमला खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा देऊन.... पुढील वर्षाच्या सुखद साहित्य सेवेला सुखद साहित्य पर्वणीला प्रत्येक साहित्यिकांना सज्ज होण्याच्या हेतूने त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो ... धन्यवाद मानतो.
साहित्य सेवेसाठी शेवटी माझा एक शेर इथे सादर करतो.
जन्मभर पुरतील इतके जोडले आहे
माणसे हृदयात जपून ठेवले आहे
साहित्य पंढरीला जाऊन धन्य झालो
मंचावरील विठ्ठल पाहून धन्य झालो
सुनील बावणे - निल
बल्लारपूर, चंद्रपूर