
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
तुत्ते तमिने हलामी थाले
तुम्हाला खायला अन्न मिळावे, शेण खाऊन जगण्याची पाळी तुमच्यावर येऊ नये म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज देऊन शेती करायला भाग पाडता, वरकड उत्पादन घेण्याची तजबीज करता आणि त्याला कर्जबाजारी करून मरणाच्या दारात लोटता.
हरामखोरांनो, तुम्ही शारीरिक कष्ट करत नाहीत, त्यामुळे तुमच्या मेंदूला शीन येत नाही, मेंदू फ्रेश आणि ताजातवाना राहून बुद्धी काम करायला लागते. अशा मेंदूचा गैरवापर करून तुम्ही कट, कपट, छल आणि कारस्थाने रचता.
तोट्याच्या व्यवसायाला आणखी तोट्यात जाईल अशी धोरणे राबवून शेतीला जाणीवपूर्वक कर्जपुरवठा करता. तोट्याच्या व्यवसायाला कर्ज दिले तर कर्जबुडीत खात्यात जाणार... इतका साधा सोपा अर्थशास्त्रीय नियम कळणार नाही इतके तुम्ही दुधखुळे नाहीत, गाढवही नाहीत, बेअक्कलही नाहीत आणि साधे भोळे तर नाहीतच नाहीत.
शेतीला कर्ज पुरवठा करण्यासाठी तुम्ही बँकांवर लादलेले जबरदस्तीचे निर्बंध काढा. शेतीला बँकेच्या नियमानुसार व शेतकऱ्यांच्या आर्थिक पात्रतेनुसार कर्जपुरवठा करण्याचे स्वातंत्र्य बँकांना द्या. तसे झाले तर एकही बँक एकाही शेतकऱ्याला कर्ज देणार नाही. शेतकरी कर्जबाजारी होणार नाही. भांडवलाच्या अनुलब्धतेमुळे शेतीतील उत्पादन घटेल त्यामुळे आपोआप शेतमालाचे भाव वाढतील. शेतकऱ्यांच्या घरात दोन पैसे येतील. शेतीचे तोट्याचे दिवस संपेल. शेतीतील उत्पादन घटेल पण शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.
पण असे तुम्ही होऊ देत नाहीत कारण तुम्हाला स्वस्तात अन्नपुरवठा पाहिजे आहे, तुम्ही पक्के हरामी आहात. म्हणून तुमच्यासाठी एकच शब्द परफेक्ट आहे तो म्हणजे #तुत्तेतमिने_हलामीथाले
- गंगाधर मुटे