![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
किमयागार पाऊस
धुळपेरणीचा पाऊस
प्राणीमात्रांना सुखावणारा
समृद्धीचे स्वप्न
मनात जागवणारा
बाळकृष्णासारख्या लिला
पाऊस दुडूदुडू धावणारा
कासवासारखा मंद चालीचा
घोडयासारखा कधी पळणारा
पिकासोबत सरीत भिजणं
आनंद न्यारा असतो
दुःख वेदना साऱ्या मनीच्या
बळीराजा आमुचा विसरतो
कडाडता वीज आकाशी
होते धस्स मनात
वावरात राघू मैना
राबतात भर पावसात
पडतो पाऊस धो धो
करतो शिवार हिरवेगार
कधी हसवतो कधी रडवतो
असा हा पाऊस किमयागार
देवदूत असतो पाऊस
सर्वत्र आनंद पेरणारा
अक्राळविक्राळ राक्षसी कधी
सारं काही संपवणारा
सुकल्या पिकास तारतो
तोंडी आला घास हिरावतो
देतो साथ पडतीला
ऐनवेळी सारे नासवतो
शेताला बसता पुराचा तडाखा
वाहतो डोळ्यातुनी पूर अश्रुंचा
धरला रागाने अबोला कितीही
पावसाशी संबध जन्मोजन्मीचा
असला बाप सत्ता गाजवणारा
वाटतो हवाहवासा तरी लेकराला
बापासारखाच पावसाचा
असतो आधार जीवसृष्टीला
कवी
लक्ष्मण लाड
परळी वै जि.बीड
मो. ९८५०५६९१३२
प्रतिक्रिया
सुंदर काव्य रचना...
सुंदर काव्य रचना...
Narendra Gandhare
मनःपूर्वक अभार
मनःपूर्वक अभार
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने