नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

वरुणा ! वरुणा !

डॉ.श्रीकृष्ण राऊत's picture

वरुणा ! वरुणा !

वरुणा ! वरुणा !
तुझ्या डोळ्यातून
झरू दे करूणा !

गाईच्या पोटाला
हिरवा चारा दे ;
चिमण्या ओठाला
दुधाच्या धारा दे.

मिठाच्या कणाला
झोंबू दे भाकर ;
मुंगीच्या सणाला
सांडू दे साखर.

तहानेचे बुंद
खुरात साचू दे ;
मुळांचा आनंद
शेंड्यात नाचू दे.

-श्रीकृष्ण राऊत
...........................................

Share

Comments

Layout Settings