पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
शेतकरी गीत
वरुणा ! वरुणा !
वरुणा ! वरुणा ! तुझ्या डोळ्यातून झरू दे करूणा !
गाईच्या पोटाला हिरवा चारा दे ; चिमण्या ओठाला दुधाच्या धारा दे.
मिठाच्या कणाला झोंबू दे भाकर ; मुंगीच्या सणाला सांडू दे साखर.
तहानेचे बुंद खुरात साचू दे ; मुळांचा आनंद शेंड्यात नाचू दे.
-श्रीकृष्ण राऊत ...........................................
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.