

वरुणा ! वरुणा !
वरुणा ! वरुणा !
तुझ्या डोळ्यातून
झरू दे करूणा !
गाईच्या पोटाला
हिरवा चारा दे ;
चिमण्या ओठाला
दुधाच्या धारा दे.
मिठाच्या कणाला
झोंबू दे भाकर ;
मुंगीच्या सणाला
सांडू दे साखर.
तहानेचे बुंद
खुरात साचू दे ;
मुळांचा आनंद
शेंड्यात नाचू दे.
-श्रीकृष्ण राऊत
...........................................
Comments
अप्रतिम.
वरूणदेवतेची सुंदर आराधना.
तिन्ही कडवी अप्रतिम झाली आहेत. :)
शेतकरी तितुका एक एक!
अप्रतिम कविता.
अप्रतिम कविता. आवडली. :)
कविता आवडली.
कविता आवडली.
छान
सूंदर कविता. मनापासून आवडली. आपल्या इतरही कविता वाचायला आवडतील.
सूंदर कविता. मनापासून आवडली.
सूंदर कविता. मनापासून आवडली. आपल्या इतरही कविता वाचायला आवडतील.
असेच म्हणतो.
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
सदस्य प्रवेश
सदस्य खाते
User Details
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
सध्या साईटवर हजर सदस्य
There are currently 2 users online.
Layout Settings