नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आलिंगनामध्ये तुझ्या हल्ली कुठे ती बात येते?
काहीतरी विपरीत आयुष्या तुझ्या माझ्यात येते
लांबून मी शाब्बासकी देतो तुझ्या फटकळपणाला
अगदी स्वतःवर वेळ आली की शिवी तोंडात येते
अपघात झालेल्या ठिकाणी थांबतो क्षणभर परंतू
लोकल अता येईल, गेले पाहिजे.. ध्यानात येते
बिनधास्त पैसे काढले अन घेतले मी जे हवे ते
कित्येक वर्षे हीच खोटी बातमी स्वप्नात येते
होतिल कशा गझला सफाईदार मोठा प्रश्न आहे
हे विस्कळित जीवन जसे आहे तसे शेरात येते
ठणकावतो इतकेच मृत्यो, न्यायला येशील तेव्हा
तितकीच आली पाहिजे जितकी मजा जगण्यात येते
----------------------------
विजय दिनकर पाटील 'कणखर'
प्रतिक्रिया
सुंदर गझल
<<<<<आलिंगनामध्ये तुझ्या हल्ली कुठे ती बात येते?
काहीतरी विपरीत आयुष्या तुझ्या माझ्यात येते
.
अपघात झालेल्या ठिकाणी थांबतो क्षणभर परंतू
लोकल अता येईल, गेले पाहिजे.. ध्यानात येते
.
होतिल कशा गझला सफाईदार मोठा प्रश्न आहे
हे विस्कळित जीवन जसे आहे तसे शेरात येते
.
ठणकावतो इतकेच मृत्यो, न्यायला येशील तेव्हा
तितकीच आली पाहिजे जितकी मजा जगण्यात येते>>>.>
खास आवडलेत.
शेतकरी तितुका एक एक!