नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
रान रानात
मी जाई
गाई भुकलेली
गवताची साई खाई
एकलाच मी गुराखी
चिऊ माऊ असे माझे पाठीराखी
दिस येता डोक्यावर
रान वेल फांदीवर तोलटाकी
फडकी कंबरची सोडता
गोडी देई खरपुस कोरकं
गाई गुरावीनं निजलेलं
रान एकटचं पोरकं.
मावळतीला गर्द छायेत
जणु निरोप देत असे सखी
अतिक्रमणाचा लालच करून
आपणच होतोय दुखी
फुलकळ्या हुंगण्यानं
गंध जाई वाड्याशी पसरत,
आता आलो मी कुंपणात
रान वाट मी गेलो विसरतं.
Dnyaneshwar.