पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
none
बरसल्या मृगधारा भिजू लागे रानमळा चाले मातीत पांभर कोंब अंकुरे कोवळा
पाती हिरवी सोनेरी पिके लावतात लळा शेत बहरून आले जसा सावताचा मळा
घाम गाळतो मातीत चिंता वाहतो जगाची उभ्या जगाचा पोशिंदा स्वप्न पाहतो उद्याची
सोने समान बियाणे सोडी भुईच्या उदरी माथी कर्जाचा डोंगर नसे रुपया पदरी
आता करुया संघर्ष आता केवळ लढणे काळ्या मातीत जगणे काळ्या मातीत मरणे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~ भरत माळी न्याहली, जि. नंदुरबार मो. ९४२०१६८८०६
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!