नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बरसल्या मृगधारा
भिजू लागे रानमळा
चाले मातीत पांभर
कोंब अंकुरे कोवळा
पाती हिरवी सोनेरी
पिके लावतात लळा
शेत बहरून आले
जसा सावताचा मळा
घाम गाळतो मातीत
चिंता वाहतो जगाची
उभ्या जगाचा पोशिंदा
स्वप्न पाहतो उद्याची
सोने समान बियाणे
सोडी भुईच्या उदरी
माथी कर्जाचा डोंगर
नसे रुपया पदरी
आता करुया संघर्ष
आता केवळ लढणे
काळ्या मातीत जगणे
काळ्या मातीत मरणे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भरत माळी
न्याहली, जि. नंदुरबार
मो. ९४२०१६८८०६
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने