Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

अविस्मरणीय संमेलन सोहळा : 12sss

Main page content

By Liladhardawande786 | 12:35 PM IST, रवी August 10, 2025
अविस्मरणीय संमेलन सोहळा
 
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळा तालुक्यातील जयसिंगपूर येथे नुकतेच शनिवार दिनांक ०८ फेब्रुवारी ते रविवार ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी शेती अर्थ प्रबोधिनी आणि शरद कृषी महाविद्यालय, यड्रावकर शिक्षण व उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन ज्येष्ठ शेतकरी नेत्या सरोजताई काशीकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या साहित्यिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.
 
एक साहित्यिक म्हणून आणि शेती विषयावर आधारित माझ्या " गुजरी " या कथेला परीक्षकांनी प्रथम क्रमांक दिला, तो स्वीकारण्यासाठी या साहित्य संमेलनात मी जातीने उपस्थित राहिलो, हे माझे सौभाग्य आहे, असेच मला वाटले. सुटी अभावी उद्घाटन सोहळा मला अनुभवता आला नाही तरी शनिवारचे कवी संमेलन, "शेतीला वारंवार कर्जमुक्ती कशाला हवी?" हा परिसंवाद ऐकता आला. खरे तर आयोजनात कुठलीही कसर आदरणीय मुटे सरांनी आणि आयोजकांनी ठेवली नव्हती. 
 
बाहेरून आलेल्या साहित्यिकांसाठी केलेली निवासाची सोय, जवळच असलेल्या उदगाव येथील निसर्गरम्य आणि अगदी शांत अशा जैन मंदिर परिसरात केली होती. माझ्यासह हा परिसर आणि तेथील व्यवस्था सर्वांनाच आवडली, यात कुठलीच शंका नाही. निसर्गरम्य वातावरणात सर्वांच्या भेटीगाठी झाल्या. आनंदी आनंद झाला... ओळख झाली... माणसाला अजून काय हवे! जेवणाचे आणि अल्पोहाराचे तर विचारूच नका... प्रत्येकांनी दोन घास जास्तच खाल्ले असेल, असे मला वाटते. जवळपास २४ तासांच्या प्रवासाचा शीण येथले वातावरण पाहून अगदी क्षणात विरून गेला. आयोजकांनी संमेलनासाठी अगदी योग्य स्थळ निवडले, असे या ठिकाणी म्हटले तर वावगे ठरणार नाही. 
 
दुसऱ्या दिवशी रविवारी मधुर संगीतात आणि सुमधुर आवाजाने सुरू झालेली शेतकरी भक्ती प्रभात तर आयुष्यात न विसरता येणारी आहे. ज्यांना दृष्टी नाही ते इतका साजरा कार्यक्रम करू शकतात तर आपण धडधाकट लोकांनी उगाच माझ्याकडे हे नाही... ते नाही म्हणून का त्रागा करायचा? एकेक गाणे ऐकताना माझ्या डोळ्यांतून गळणारा आसवांचा पाऊस कदाचित कुणी बघितलाही असेल. यावेळी आत्मानंद, भावविभोर वगैरे सारे शब्द त्या व्यासपीठावर येऊन बसले होते, असे मी म्हणेन. काय तो कार्यक्रम... काय ती आवाजाची जादू... काय ते संगीत... सारं काही अभूतपूर्व होतं... खरेच... रसिकांनी वन्स मोअरची केलेली मागणी अगदीच रास्त होती... सलाम त्या कलाकारांना...!
 
त्यानंतर स्पर्धेतील विजेत्यांचा योग्य सन्मान झाला... समारोप झाला... मुटे सर लिखित, विवेक मुटे आणि आमचे कविमित्र सुनील दादा बावणे यांनी केलेली गर्जना मात्र हृदयात घर करून गेली. त्यानंतर परत परतीच्या वाटेवर असलेल्या पाखरांना सुग्रास भोजनाचा आस्वाद घेता आला. एक तृप्तीची ढेकर देऊन पुढल्या प्रवासाला लागलेल्या पाखरांना पुन्हा नव्या सोहळ्याच्या निमंत्रणाची आस आहे... विशेष म्हणजे सहृदयी बाळासाहेब गिरी, कुकडे दादा, कांबळे दादा, लक्ष्मणजी हेंबर्डे सर, साईनाथ दादा, सुरेख बोरकर ताई आदींची भेट झाली, हा अमृतयोगच म्हणावा.
 
सारे काही अविस्मरणीय होते... एक वेगळाच आनंद... एक वेगळीच धुंदी... धन्यवाद मुटे सर आणि समस्त आयोजक.. परीक्षक महोदय... पुन्हा नक्की भेटू!
 
लीलाधर दवंडे
कामठी (नागपूर)
८४१२८७७२२०





बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर 

दिनांक : शनिवार, दि. ८ व रविवार, दि. ९ फेब्रुवारी, २०२५  

स्थळ : युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, सहकारमहर्षी शामराव

पाटील यड्रावकर नाट्यगृह 
जयसिंगपूर ता. शिरोळ जि. कोल्हापूर
 
अंगारमळा विशेषांक (स्मरणिका) मार्च २०२५
प्रतिनिधींचे मनोगत
१२ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
12sss
अभिप्राय
साहित्य चळवळ
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 1903 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 0 सदस्य उपस्थित आहेत.

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 5 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    1 day 6 hours ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    1 day 6 hours ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    1 day 6 hours ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    1 day 6 hours ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    2 days 6 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - 2023-24 456
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 165
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 163
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 159
किती चाटणार भारतपुत्रा? 157
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 156
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 153
कापला रेशमाच्या सुताने गळा 142
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 94
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 58
किसान क्रांती 36
माझे फेसबूक स्टेटस-1 35
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 26
गझल 19
मातृत्वाचा शृंगाररस 18
नाटकी बोलतात साले! 18
दुःख मातीतले.... 18
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 17
IT कार्यशाळा - लेखन कसे करावे? - भाग-१५ 16

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 217,979
माझे फेसबूक स्टेटस-1 180,845
शुभारंभ 134,900
रानमेवा - भूमिका 109,384
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,382
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,220
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,530
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,774
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,576
उद्देश आणि भूमिका 77,434
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,417
विचारपूस 71,690
गणपतीची आरती ॥३५॥ 67,710
सत्कार समारंभ : वर्धा 66,721
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,278
किती चाटणार भारतपुत्रा? 61,357
जात्यावरची गाणी 55,996
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,368
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,037
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,344

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini