Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




कृषिप्रधान देशातील हतबल शेतकरी

लेखनविभाग :: 
ललितलेख

भारत हा कृषिप्रधान देश आहे, कृषी प्रधान असणाऱ्या देशात ८०% लोक शेती करतात.शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेचा एक मूलभूत घटक आहे .जगाचा पोशिंदा ज्याला म्हणतात तो माझा 'शेतकरी बाप' खऱ्या आयुष्यात मात्र उपाशीपोटी झोपतो. धरती मातेला सुजलाम सुफलाम बनवणारा माझा शेतकरी बाप रात्रंदिवस शेतीत राब राब राबतो. शेतकऱ्यांच्या कष्टाबरोबरच त्याच्या शेतमालाला कितपत योग्य बाजारभाव आपल्या सर्वांना चांगलेच माहिती आहे बर!
शेतकऱ्याची मुलं आत्महत्या करतात आणि सरकार याचं कारण सांगते की, प्रेम प्रकरण, दारू या सर्वांमुळे शेतकऱ्याची मुल आत्महत्या करतात पण खरी परिस्थिती समजून घेतली तर शिक्षणासाठी पैसा नाही भविष्याचा प्रश्न या चिंतेने मुलं स्वतःचा जीव गमावतात. शेतीवर राबराब राबणारा काळ्या आईवर प्रेम करणारा त्या मुलाचा बाप एवढे कष्ट करून त्याच्या वाटेला काय आले हो?आज शेतकऱ्याला शेती करण्यासाठी सुद्धा कर्ज घेण्याची वेळ कोणामुळे आली हो? स्वतःच्या शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्याने अनेक शेतकरी स्वतःचा जीव एका मिनिटात गमावतात शेतकऱ्याला का एवढे सहन करावे लागते .निम्म्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून मुलांना शाळेला पाठवले,दूध डेरी वर कर्ज, बँक वर कर्ज , एवढेच नाही तर सौभाग्याचा अलंकार ज्याला म्हणतात ते' मंगळसूत्र' सुद्धा आज बँकेत गहाण तुम्हाला दिसेल. महात्मा फुले नावाच्या महामानवान राणी विक्टोरिया च्या दरबारात जाऊन सांगितलं होतं , भारत देशाची ध्येय गुण ठरवायची असेल तर सुटा बुटात हिंडणाऱ्या माणसांकडे पाहून ठरवू नका तर, शेतात अनवाणी पायाने फिरणाऱ्या माझ्या शेतकऱ्याच्या हाल अपेष्टा पाहून ठरवा पण, आजही भारताची ध्येय गुण ठरवली जातात ,मुंबईला आर्थिक निर्देशांकांची इमारत आहे ,इमारतीच्या बाहेर बैलाचे चित्र आहे. बैलाने मान वर घेतली की आर्थिक निर्देशांक उंचावतो आणि बैलाने मान खाली घेतली की आर्थिक निर्देशांक मंदावतो असे म्हणतात. 'जावे कवितांच्या गावा' पुस्तक लिहिणारा कवी आपला कवितेत सांगतो
"बाबा स्वतःच्या डोक्यावरच्या कर्जाला पाप समजणारा पुण्यवंत तुझ्या शरीरात का जन्म घेतो, तो आत्मा इंजिनियर ,डॉक्टर, वकील यांच्या घरात का जन्म घेत नाही ज्या वेळेस हा आत्मा डॉक्टर ,वकील, इंजिनियर, यांच्या घरात जन्म घ्यायला लागेल ना तेव्हा शेतकरी आत्महत्या का करतो ,कशासाठी करतो, या सर्वांची उत्तर या अर्थव्यवस्थेलाभेटल्याशिवाय राहणार नाही" ही व्यवस्था शेतकऱ्याची पोट भरू शकत नाही पण आज शेतकरी या व्यवस्थेचे पोट नक्कीच भरतो बरं. आणि जर व्यवस्थेला आपलं पोट वेळोवेळी भरवायचं असेल तर जेव्हा शेतकरी स्वतःचं पोट भरू शकत नव्हता तेव्हा ,तो रस्त्यावर उतरला तेव्हा तो औरंगाबादला उतरला त्याच्या अंगावर डांबर फेकण्यात आलं, बारामती मध्ये रस्त्यावर उतरला त्याच्या अंगावर पाणी मारण्यात आलं ,कराडमध्ये रस्त्यावर उतरला तेव्हा त्याच्या अंगावर शाही फेकण्यात आली, आणि पुण्यामध्ये मावळ प्रांतामध्ये उतरला तेव्हा त्याच्या अंगावर लाठ मार गोळी हल्ला करण्यात आला, म्हणजे जेव्हा स्वतःच्या हक्कासाठी शेतकरी रस्त्यावर उतरला तेव्हा त्यावेळेस त्याला शिव्यांच्या लाखोल्या वाहण्यात आल्या, आणि निवडणुका जवळ आल्या तेव्हा स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी कर्जमाफी नावाच आश्वासनाचा गाजर दिलं .आज सुद्धा डोंगराळकिनारी जमीन तशीच उनाड पडलेली आहे.
शेतकरी बापाच्या मनातली भावना ही कविता नक्की सांगून जाईल
"रुपया रुपया करत जोडली मी नाणी
तरीसुद्धा कर्जाची सुटत नाही फेरी
मुलगा मुलगी दोन अपत्ये
शिक्षण आले जवळी
बाबा बाबा मला डॉक्टर व्हायचे
आवाज आला कानी
अरे बाळा कोणास सांगू?
मी आहे कर्जबाजारी
मी आहे कर्जबाजारी
दसरा दिवाळी कधी गोड जात नाही
बायको माझी कधी साडीही घेत नाही
दुष्काळ गारपीट वादळांचे संकट
त्यात बघा कसा हा बाजारांचा भाव
आत्महत्या करू की उपाशी मरू
सांगणारे देवा मी शेतकरी मी काय करू
माझी काळी आई ही जणू माझ्यावर रुसली
खतपाणी नाही म्हणून जागेवर सुकली
माझ्या झोपडीने ही माझी साथ सोडली
माझ्या घराची पाचट ही जणू उडूनच गेली
एकच विनंती तुमच्याकडे
माझा संदेश पाठवा सरकारकडे
शेतकरी पिकवतो शेतीत धान्य
तेव्हाच मिळते तुमच्या घरात अन्न
तुळशी शिवाय शोभा नाही घराला
शेतकऱ्याशिवाय अर्थ नाही तुमच्या आमच्या जगण्याला
शेतकऱ्याशिवाय अर्थ नाही तुमच्या आमच्या जगण्याला"

साऱ्या दुनियेच्या जगण्याचा गाभा शेती आणि शेतकरी .शेतीत लबाडी फसवणूक कधीही चालत नाही, फक्त चालतं ते कष्ट आणि कष्ट. आणि ते अवलंबून असतं ,फक्त निसर्गावर मग
त्याचे परिणाम आणि यात जीव गमावतो माझा शेतकरी बाप.
"काळ्या मातीतून कोंब फुटलं
आणि पीक डोलदार झालं
त्याला डोलदार पीक म्हणतात
आणि दोन वेळेस पोट भरू शकत नाही त्याला जगाचा पोशिंदा म्हणतात
न आक्रोश करता मिळत त्याला सातव वेतन म्हणतात
लाखो आत्महत्या करून मिळणाऱ्या बक्षीसाला कर्जमाफी म्हणतात"
भारत कृषीप्रधान देश आहे असे म्हणण्याचे दिवस जणू संपलेच . देशातील इतर लोकांना आणि पुढाऱ्यांना आता शेतकऱ्यांची गरज उरली नाही .कृषी प्रधान आणि विविधता पूर्ण असलेला हा देश मुळापासून विस्कटून टाकला जात आहे .शेतीसंबंधीचे तीन कायदे मागे घ्यावे, या मागणीसाठी गेले सलग नऊ महिने पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश ,आणि देशभरातील विविध राज्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सर्वस्व पणाला लावून सिंधू बॉर्डर ,गाझीपुर बॉर्डर , दिल्लीच्या सीमांवर लोकशाही मार्गाने आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. हा प्रश्न फक्त शेतकऱ्यांचा , खेड्यांचा नाही तर या देशातल्या प्रत्येक नागरिकांचा आहे जो शेतकऱ्याने पिकवलेले धान्य खातो. या देशातील सर्वसामान्य लोक कष्टकरी नोकरदार मध्यमवर्गी निम्न मध्यमवर्गी ,निम्नवर्गी ,अशा सर्व नागरिकांसाठी येणाऱ्या काळात हा प्रश्न जीवन मरणाचा असणार आहे .हे कायदे मोजक्या बड्या भांडवलदारांच्या हिताचे आहेत. देशाला रोज जगवणारा शेतकरी अन्नदाता आता देशाचा रक्षक म्हणून ऊन वारा थंडी पावसात या लढ्याला स्वतःच्या खांद्यावर घेऊन ठाम उभा आहे. छत्रपती शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्याचा लढा लढवणारा शेतकरी कष्टकरी अठरापगड मावळा होता, लालबहादूर शास्त्री यांनी 'जय जवान जय किसान' हा नारा दिला, या किसानांचे कैक हजारो जवान पुत्र देशासाठी सीमेवर शहीद झाले ,आणि अजूनही होत आहेत. आज किसान विरुद्ध जवान उभे केले जात आहेत आंदोलन स्थळावरील वीज पाणी इंटरनेट बंद केले गेले, रस्त्यांवर खिळे ठोकले , भिंती उभारल्या गेल्या ,शांतपणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर दगडफेक केली गेली , पोलीसबळ वापरून अश्रूधूर ,अमानुष, लाठीचार केला गेला.लखिमपुर खिरी येथे रस्त्यावरून चालणाऱ्या शेतकऱ्यांना पाठीमागून चार चाकीने निर्दयीपणे चिरडून टाकले गेले, हे सगळे कोणा अतिरेक्यांसाठी, दहशतवाद्यांसाठी शत्रूंसाठी नव्हे तर, या देशातील अन्नदात्यांसाठी केले गेले का? तर त्यांनी कायद्यांना विरोध केला म्हणून 'शेतकऱ्यांच्या कणसाला दाण्या गोठ्यालाही हात लावता कामा नये' अशी आपल्या सरदाराना सक्त ताकीद देणारे सकलजनप्रतिपालक शिवाजी महाराज राज्यकर्ते म्हणून, खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभे राहिले, शिवकाळात ज्वारीच्या कंसाच्या रक्षणासाठी तलवार होती, ही तलवार कणीस पिकवणाऱ्यांवर कधी उभारली गेली नाही ,उभारली गेली तेव्हा उगार उगारणाऱ्यांचे हात कलम केले गेले.
गांधी-लोहिया आणि एकूणच शेतकरी विचार या सगळ्यांना स्पर्श करणाऱ्या केदारनाथ सिंह यांच्या कवितेच्या ओळींची तीव्रतेने आठवण होते. शेतकरी सामान्य माणूस ते श्रीमंत व्यक्ती यांच्यातील थेट नात्यांवर या ओळी प्रकाश टाकतात
"वह जो आपकी कमीज है
किसी खेत मे खिला
एक कपास का फुल है"
आणि आज कपाशीचे भाव किती आहेत हे आपल्या सर्वांना चांगल माहिती आहे बरं !
भारत कृषी प्रधान देश असूनही शेतकऱ्यांची अवस्था कधी कधी अत्यंत दयनीय होते. अवकाळी पाऊस, दुष्काळ, पिकांना योग्य भाव न मिळणे, कर्जाचा बोजा यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे. या कठीण परिस्थितीत त्याच्या पत्नीला सर्वात जास्त वेदना आणि संघर्षाला सामोरे जावे लागते. पती गमावल्यानंतर ती एकटीच राहते आणि कुटुंब सांभाळण्याची जबाबदारीही तिच्या खांद्यावर येते.
ती पूर्ण भांबावलेली होती. कुठे उभे राहावे? कसे उभे राहावे? काय बोलावे? तिला काहीही सुचत नव्हते. समोरचा कोणीही सूचना करी, त्याप्रमाणे ती कृती करी. टीव्ही वाहिन्यावाल्यांनी आपले माईकचे दंडुके समोर धरले होते. दारिद्र्य, कुपोषण, रापलेपण तिच्या चेहऱ्यावर दिसत होते.
तिच्या शब्दांत, उच्चारांत, हालचालींत संपूर्णपणे हताशपणा जाणवत होता. एका शेतकऱ्याची ती पत्नी. त्या शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. टीव्हीवाल्यांनी वेगवेगळ्या पद्धतींनी सुचवल्यावर ती बोलू लागली…
“साहेब काय बोलू? नि काय सांगू? घरमालकांनी आपलं जीवन संपवलं आणि गेले… आम्हांला वाऱ्यावर सोडून! तेरावं होईपर्यंत शेजाऱ्यापाजाऱ्यांनी आम्हांला जेऊ खाऊ घातलं. ती तरी आणखी किती घालतील? दोन मुलं पदरात आहेत.
कोणाकोणाकडे काहीबाही मागून मागून पोट भरतोय आम्ही. सरकारने एक लाख रुपये दिले होते. त्यातले तीस हजार एका साहेबानेच काढून घेतले. उरलेले सावकाराने घेतले.
आता सांगा आम्ही गरिबांनी जगायचं कसं? माझं काहीही लय मागणं नाही. आम्हां गरिबांना काम दया. मी कष्ट करीन. कष्ट करून मुलांना मोठं करीन.” तिने बोलता बोलता पदराचा बोळा तोंडात कोंबला.
हुंदका आवरला आणि पुढे बोलू लागली… “घरातल्या कर्त्या पुरुषाने स्वत:ला संपवलं. आता आम्ही काय करायचं? आणि करणार तरी काय? आभाळच फाटलं तिथं कुठं कुठं ठिगळ लावणार? म्हणजे पूर्वी फार सुखात होतो, असं नाही.
पण हे होते, तेव्हा निदान अर्धा घास तरी पोटात जायचा. आता मात्र अंधारच कोसळतोय अंगावर! “परंतु दिवसच फिरले. दोन-चार वर्षे धड पाऊसच झाला नाही. केलेली पेरणी फुकट गेली. पुन्हा पेरणी केली तर बियाणे खराब निघाले.
गत वर्षी पाऊस बरा झाला. कापूस मायंदळ आला; तर तो उचललाच गेला नाही. पैशाचे वांधे झाले. केलेला खर्चही भरून निघाला नाही. त्यात पोरगी मोठी झाली. गेल्या वर्षी तिचं लग्न करून दयावं लागलं. प्रत्येक कामाला पैका लागतो.
सरकारी बँकांचा तर उपयोग होतच नाही. मग गावातल्या सावकाराकडूनच उचल केली. परतफेड तर करणंच शक्य झालं नाही. दामदुप्पट व्याजामुळे कर्जाचे आकडे सतत फुगतच जात होते.
त्यातच घरातल्या म्हाताऱ्या माणसांचं आजारपण उभं राहिलं. अडचणी सारख्या वाढतच होत्या. मालक सारखे अस्वस्थ राहत. “या वर्षी मालकांनी खूप धावाधाव केली. अगदी मुंबईपर्यंत जाऊन आले. पण कुठूनही मदत मिळाली नाही.
सावकाराकडून पैशाचा तगादा चालूच होता. मदतीचा हात कुठूनही नव्हता. मालक दुःखात बुडालेले; गप गप असत. मग एक दिवस शेतावर गेले ते परतलेच नाहीत. स्वत:च लावलेल्या झाडावर गळफास लावून घेतला आणि जीवन संपवले!

“ते गेले ,पण आम्ही काय करायचे? माझी पोरं अजून लहान आहेत. त्यांना शिकवायचं आहे. शेत बळकावण्यासाठी गावातील सावकार उत्सुक आहे. सरकारकडून मिळालेल्या एक लाखातली एक दमडीही आम्हाला मिळाली नाही.
रोज एक वेळचंही जेवण नीट मिळत नाही. आम्ही वाटेल ते कष्ट करायला तयार आहोत. पण आम्हांला अन्न दया. गावातील इतर कुटुंबांचंही हेच दुखणं आहे. “आता सांगा, आम्ही काय करायचं? कसं जगायचं? आम्हांला जगू दया. या सावकारांपासून वाचवा. मला आत्महत्या करायची नाहीय. माझ्या मुलांसाठी तरी मला जगायचंय!” या वरून समजते..
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याची पत्नी ही विचित्र परिस्थितीतही आपल्या कुटुंबाची काळजी घेणारी नायिका आहे. शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आपल्या समाजाचे वास्तव त्यांच्या वेदना आणि संघर्ष अधोरेखित करतात. अशा वेळी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढून शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरविणे अत्यंत गरजेचे आहे, जेणे करून भविष्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि त्यांच्या पत्नींना या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.
शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही ,त्याच्या कष्टाला किंमत नाही, आज मुलांच्या पालन पोषणाचा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे, या सर्वांना जबाबदार कोण? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सरकारने आम्हास द्यायला हवी.

"शेतकऱ्याच्या नशिबी लिहिलंय फक्त दुःख
राब राब राबुनी मिळते का ओ फळ
लाखाचे कष्ट त्याचे
किंमत मात्र रुपयात
खरं सांगा कसं असेल शेतकऱ्याचे जीवन
लग्नाची चिंता त्यात शिक्षणाचा विचार
शेतकरी बापाची खूपच वाईट हालं
दोनशे रुपये भाव व्यापाराच्या मालाला
वीस रुपयांनी मोजतात शेतकऱ्यांच्या कष्टाला
अंधारात पाणी भरायला बाप जातो शेतात
वाघ बिबट्याची भीती आहे मनात
विचार करा शेतकरी बापाचा
पैसा नको फुकटचा
द्या हो आमच्या कष्टाचा
शेतकऱ्याच्या घामाचा
तोच पोशिंदा जगाचा"

नाव- निर्मळ वैष्णवी नानासाहेब
तिसरे वर्ष फार्मसी विद्यार्थिनी
८४४६०४६७२८