पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
डोळे पाण्याचा बंधारा
डोळे पाण्याचा बंधारा तिथे दु:खानंद होड़ आणि खा-या साम्राज्याचा अश्रू थेंब खरा जोड़
अश्रू थेंब खरा जोड़ उपाशी गं उदराचा सारे बंद होता दारे काठ ओला पदराचा
काठ ओला पदराचा कुठे रडला मयूर खळबळ लांडोरीस मनी नको ते काहूर
मनी नको ते काहूर हात कुंकवाला जाई धनी नापिकी कर्जाने फाशी गेला तर नाही
फाशी गेला तर नाही सये माहेराला बंधू धागा दैव तुटलेला सांग कोणाला मी बांधू
- प्रशांत पनवेलकर वर्धा. ------------------------- ( अष्टाक्षरी )
सुरेख कविता.
शेतकरी तितुका एक एक!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
प्रतिक्रिया
सुरेख कविता.
सुरेख कविता.
शेतकरी तितुका एक एक!