नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
डोळे पाण्याचा बंधारा
डोळे पाण्याचा बंधारा
तिथे दु:खानंद होड़
आणि खा-या साम्राज्याचा
अश्रू थेंब खरा जोड़
अश्रू थेंब खरा जोड़
उपाशी गं उदराचा
सारे बंद होता दारे
काठ ओला पदराचा
काठ ओला पदराचा
कुठे रडला मयूर
खळबळ लांडोरीस
मनी नको ते काहूर
मनी नको ते काहूर
हात कुंकवाला जाई
धनी नापिकी कर्जाने
फाशी गेला तर नाही
फाशी गेला तर नाही
सये माहेराला बंधू
धागा दैव तुटलेला
सांग कोणाला मी बांधू
- प्रशांत पनवेलकर
वर्धा.
-------------------------
( अष्टाक्षरी )
प्रतिक्रिया
सुरेख कविता.
सुरेख कविता.
शेतकरी तितुका एक एक!
पाने