नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
राजकीय धुरंधरांचा, घास रोज अडतो ओठी
कृषिकहो तुमच्यासाठी, श्रमिकहो तुमच्यासाठी |ध्रु|
वावरतो फिरतो आम्ही, सत्तेत विरोधी बसतो
मनी विचार सदैव आमुच्या, दिवट्या चिमण्यांचा असतो
परि आठव येता तुमचा, देऊ आश्वासने वांझोटी |१|
राबता उपाशी तुम्ही, जगतास अन्न देऊनी
तुमच्यास्तव आमची सत्ता, तुमच्यास्तव ही घराणी
हमीभाव बाजुला करुनी, आम्ही कमावितो कोटी |२|
उगवला दिवस हा पळतो, अंधार दाटतो रात्री
आम्ही विदेशात मग पळतो, तुमच्याच खिशाला कात्री
करू विमानात बैसुनी, दुष्काळ पाहणी मोठी |३|
कर्जास बुडविले पार, आम्हीच जाणिले थोर
का जीवास लावी घोर, का गळ्यात घेई दोर
सरसकट माफी करतो, टाकुनी अंशतः अटी |४|
दिवाकर जोशी
परळी वैजनाथ जि.बीड
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
पाने