Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

बळी बळीराजाचा

Main page content

Dilipbhoyar
By Dilipbhoyar | 11:58 PM IST, मंगळ November 14, 2023
वैचारिक लेख
शेतकऱ्याचा राजा बळीराजा

बळी बळीराजाचा

 

      पुराण काळात एक राजा होऊन गेला, त्याचे नाव “ बळीराजा ” त्या काळात शेतकऱ्यांच्या  कष्टाला मोल होते, समृद्धी होती,सुरक्षा होती,शेतकरी आनंदी ,समाधानी व सुखी होता त्याचा बटू वामनाने बलीप्रतीपदेला कपटाने घात केला, त्याला पाताळात गाढले अशी पुराणात कथा आहे .या बटू वामनालाच विष्णूचा ‘वामनावतार’  ग्रामीण भागातील स्त्रिया आजही  बलीप्रतीपदेला स्मरण करतात , ‘‘ईडा पिडा टळू दे ,बळीचे राज्य येऊ दे .’’

      शेतीचा शोध लागणे आणि शेतमालाची लुट होणे हा प्रवास सोबतच चालला ,फक्त बटू वामनाचे कालप्रवाहात स्वरूप बदलले,सुरवातीला चोर ,लुटारू ,नंतर दरोडेखोर नंतर राजे आणि आता तथकथित स्वातंत्र्यानंतर धोरण राबविणारे प्रशासन,लोकप्रतिनिधी,मंत्रिमंडळ अर्थात लोकशाहीतील राज्यकर्ते त्यासोबत काही महापुरुषांनी शेतीच्या शोषणाविरुद्ध विचार मांडले,लढा दिला,संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न केला, शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला.त्यात शेतकऱ्यांचा राजा “छ.शिवाजी महाराज”, शेतकऱ्याचा आसूड लिहिणारे “म.ज्योतीराव फुले”,शेतकऱ्यासाठी ग्रामगीता लिहून त्यांना अर्पण करणारे “वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज”,स्वातंत्र्यानंतर “जय जवान जय किसान” नारा देणारे दुसरे पंतप्रधान “स्व.लालबहाद्दूर शास्त्री”,त्यानंतर शेतमालाला उत्पादन खर्चानुसार भाव मिळणे हा त्यांचा श्रमसिद्ध हक्क आहे. हे सांगणारे,शेतकऱ्यांमध्ये चेतना निर्माण करून त्यांच्यासाठी आयुष्य अर्पण करणारे “युगात्मा शरद जोशी”.हा शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेणाऱ्या महापुरुषांचा प्रवास आहे.

       या संपूर्ण प्रवासात शेतमालावर प्रक्रिया करणारे यंत्र येण्यापूर्वी महात्मा जोतीबा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात लिहिल्यानुसार धर्म व कुप्रथेच्या माधमातून शेतीची लुट होत होती.त्यानंतर वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितल्यानुसार –
 

               कच्चा माल मातीच्या भावे,पक्का होताची चौपटीने घ्यावे |

               मग कैसे सुखी व्हावे ग्रामजन,पिकवोनिया उपाशी || ग्रामगीता ||
 

      इंग्रज आमदानीत भारतीय शेतकऱ्यांचा माल कापूस,ज्यूट इ. लंडन, माचेस्टरला नेतो व तेथून कापड तयार करून चौपट भावाने येथे विकतो,आपल्या देशाला वसाहत म्हणून वापरतो म्हणून स्वदेशी ची चळवळ सुरु झाली.या लढ्यात बाबू गेनू सारख्या तरुणाने मालाने भरलेल्या ट्रक खाली स्वतःला चिरडून घेतले.

     देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र मिळाले.शेतकर्यांना न्याय मिळेल हि अपेक्षा होती.कारण स्वतंत्र्याच्या चळवळीत शेतीचा शोषणाचे प्रश्न होते उदा. कापूस, जूट, मीठ ,निळी ई. प्रश्न घेऊनच स्वातंत्र्याची लढाई लढल्या गेली होती.शेत मालाच्या व्यापारातून व प्रक्रियेतून इंग्रज शेतकर्यांना लुटतो,देशाला लुटतो .भारतीय शेतकरी म्हणजे देश.शेतीवरच सर्व अर्थव्यवस्था अवलंबून होती. पण पुन्हा राज्यकत्यांनी देशांतर्गत  वसाहत वादी धोरण कायम ठेवले.कारण औद्योगिकरणाचा विकास करायचा होता त्यासाठी कारखान्याला लागणारा माल स्वस्त व कामगारांना खायला स्वस्त धान्य पुरवायचे होते. ‘ आयजीचा उरावर, बायजी उदार’ हे धोरण राबविण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या मूळ राज्य घटनेत केवळ ८ परिशिष्टे होती.त्यात १९५१ मध्ये घटना दुरुस्तीचा नावावर परिशिष्ट ९ जोडण्यात आले. त्यात २८४ कलमा लिहिण्यात आल्या त्यापैकी २५७ कलमा शेती विरोधी लिहून पुन्हा शेतकऱ्याला शोषणाच्या खाईत ढकलण्यात आले.
 

१) जीवनावश्यक वस्तूचा कायदा (१९५५) 

२) शेतमाल वाहतूक कायदा 

३) जमिन धारणा नियंत्रण कायदा 

४) शेतमाल उद्योग प्रक्रिया कायदा (१९५१) 

५) देशातील बाजार पेठेवर राज सत्तेचा अधिकार 

६) या नियंत्रणामुळे शेतीमाल व विविष्टावर ७२% कर लावून शेती क्षेत्राची लुट ई.
 

     परिमाणत: राज सत्तेचा आर्थिक व्यवहाराशी झालेला संगम , नियोजन मंडळ हे भ्रष्टाचाराचे कुरण ठरले.राजकारण पैसा कमावण्याचा धंदा बनला. याचे मूळच त्यात दडले आहे.कारण उद्योगासाठी परवाना ,परमिट ,कोटा पद्धत सुरु झाली.अनुउत्पादक नोकरशाही शिरजोर झाली.उद्योजक अडचणीत - भ्रष्टाचार बोकाळला ,नव ग्रामीण औद्योगिकरणाचा मार्ग कायम बंद झाला.

      या घटना दुरुस्ती बद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यसभेतील आपल्या भाषणात   “ गलिच्छ ’’ व  “ राक्षसी ’’ म्हटले होते.
 

      १९७० च्या दशकात डॉ.स्वामिनाथन यांच्या नेतृत्वात हरितक्रांती आली.हायब्रीड संकरित वाणामुळे अन्नधान्याचे उत्पादन वाढले,अन्नधान्याची समृद्धी वाढली,धान्य टंचाईचा प्रश्न सुटला पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही.कारण शेतमालाचे भाव खालच्या पातळीवर ठेवणारा परिशिष्ठ ९ मधील जीवनाशक कायदा (१९५५) त्याकरिता समाजवादाच्या नावाखाली प्रक्रियाबंदी,झोनबंदी,जिल्हाबंदी,प्रांतबंदी शेतमालाची आयात,शेतमालाची स्वस्त दराने जबरदस्तीने बाजारभावाच्या निम्मे दराने शासकीय खरेदी (लेव्ही वसूल करणे ) करणे अशाप्रकारे देशी राज्यकर्ते शेतकऱ्यांसाठी “लुटारुंच्या फौजा” ठरल्या .परंतु १९८० च्या दशकात शेतकऱ्यांना याची जाणीव होऊ लागली हे सर्व देशभक्तीच्या नावावर, कायदा व नियमाच्या नावाखाली शेतकरी सहन करत गेला.
 

      त्याचवेळी शेतकऱ्यासाठी एक अत्यंत उच्चविद्या विभूषित प्रतिभावंत स्वातंत्र्यसुर्य उगवला “युगात्मा शरद जोशी.” त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना करून स्वत: नेतृत्व केले. शेतीविरीधी कायदे शिथिल व्हावे,नष्ट व्हावे यासाठी आंदोलने सुरु झाली,टोकाचा संघर्ष झाला,मोठ्या प्रमाणात मंथन सुरु झाले. शेतकरी,महिला,तरुण रस्त्यावर येऊन लाखोच्या संखेने आदोलनात सहभागी झाले .परंतु सरकारच्या धोरणात,त्यांच्या नीतीत बदल झाला नाही.१९९४ मध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले.शेतकरी संघटनेने मा.शरद जोशींच्या नेतृत्वात त्याचे स्वागत केले.केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय व्यापार व जकात करारावर (gatt) सही केली. १४० देश या करारात सभासद झाले.मा.शरद जोशींना अपेक्षा एवढीच होती की,देशी राज्यकर्ते शेतकऱ्यांना न्याय देत नाही तर खुल्या व्यापारातून तरी शेतमालाला न्याय मिळेल.

आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराच्या निमित्ताने भारतीय शेतकऱ्यांची लुट जगापुढे आली.ती भारतीय शेतकऱ्यांना (- उणे) अनुदानाच्या रूपाने कळली. एवढाच फक्त त्यापासून फायदा झाला. या करारानुसार सभासद राष्ट्रांनी उत्पादन खर्च + 10 % नफा इतके संरक्षण त्या देशातील सर्वच क्षेत्रातील उत्पादकांना,शेतीला सुद्धा द्यावे. असे ठरले होते.
 

       परंतु भारतीय राज्यकर्त्यांनी जुनीच नीती कायम ठेवली उलट शेतीक्षेत्रातील नवीन जगभरात मान्यता असलेल्या संशोधनावर व तंत्रज्ञानाच्या वापरावर बंदी घातली. ती आजही सुरूच आहे. स्वातंत्र्यानंतर समाजवादाच्या नावाखाली शेतीमालावर बंधने लावून व खुल्या व्यवस्थेत करार तोडून शेतमालाची आयात व निर्यात बंदी करून शेतकऱ्यांना लुटण्याचाच शासनाने धंदा सुरु केला..समाजवादी व्यवस्था (कायद्याचे राज्य )व मुक्त व्यापार व्यवस्था या दोन्ही व्यवस्थेत राज्य कर्ते शेतकऱ्याला बेईमान ठरले.
 

     याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक सन्मान धोक्यात आला.भांडवल विकून तो जगू लागला शेती उत्पादनाची एकूण भांडवली व्यवस्था (खटला )कोसळली व कर्ज बाजारी पणाला कंटाळून आत्महत्या करू लागला.आज रोजच्या शेतकरी आत्महत्या वृत्तपत्रातून वाचायला मिळतात.आज पर्यंत त्याकरिता अनेक शोध सामित्या शासनाने नेमल्या.त्या सर्वच  समित्यांचा अहवाल जवळ पास असा की, शेत मालाचा उत्पादन खर्च निघत नाही, म्हातारपण, आजारपण, कौटूबिक खर्च, शिक्षण ,लग्न प्रसंग ,शेती उत्पादनाच्या साधनांचे वाढलेले खर्च ,त्यामुळे आलेल्या कर्ज बाजारी पणा मुळे तो आत्महत्या करतो.त्याला संरक्षणाची व मदतीची गरज आहे. तरीही राज्य कर्त्याच्या नीतीत काहीही फरक पडत नाही.आज शेतकरी शेतीत हतबल आहे ,शेतकर्याची मुलं  शेती सोडून जात आहे, छोट्या - मोठ्या नोकरीत त्यांना शेती पेक्षा अधिक सुरक्षितता दिसते.ग्रामीण भागातिक शोषीत ,भणंग स्थिती मुळे शेतकऱ्याचा मुलाला कोणीही मुलगी द्यायला तयार नाही हि सामाजिक स्थिती आहे.शेतकर्यांनी कंटाळून शेती सोडावी व ती मोठमोठ्या उद्योगाच्या ताब्यात द्यावी व त्यांचे कडून खंडण्या वसूलत राहाव्या. अशी सर्वच पक्षांच्या राज्य कर्ताची धोरणे दिसतात.

  म्हणून या देशातील बळीराजा हा बळी देण्यासाठीच जन्माला येतो की काय? असे वाटायला  लागते.
 

‘‘ त्याच्या वेदना त्यातच गुदमरल्या

अन मरत जगण्यापेक्षा

त्यानं आपलं रोजच मरण पत्करलं

त्याचा मरणाचं सत्य शोधन सुरु झालं

सत्य कळूनही मरण नालायक ठरवल्या गेलं

अन त्याचा आकांताच्या वेदना

पुन्हा इथेच गुदमरल्या

इथेच गुदमरल्या......  ’’ ( ‘‘ गुदमरलेल्या वेदना ’’ या कवितेतून ) 
 

    काळ कितीही वाईट असो , इतिहास असा सांगतो कि, हुकुमशाही राजवटीत  रयतेने  बंड केले , जुल्मी राजसत्ता हाणून पाडली .रयतेने न्यायाचे राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला व ते यशस्वी झाले.या उलट समाज जर सहनशील ,अन्याय सहन करणारा असला ,आत्महत्या करेल पण आवाज काढणार नाही ,लढणार नाही.असा षंढ मानसिकतेचा समाज लोकशाहीत सुद्धा ( लोकांनी ,लोकाकडून ,लोकांकरिता स्थापन केलेले राज्य )गुलामीत जाऊन शोषीत –पिडीत जीवन जगतो.
 

   ही अवस्था आपण आज जगत आहोत.बळीराज्याला सावध करण्यासाठी दैत्य गुरु शुक्राचार्य आले पण ,दातृत्वाच्या नशेत ,पूर्वजांच्या दातृत्वाच्या बटू वामनाने केलेल्या स्तुती पाठात आमचा बळीराजा वाहून गेला. त्यावेळी सावध झाला नाही व तो बटू वामनाचा तिसऱ्या पावलाने पाताळात गाडला गेला.आपल्याला सुद्धा १९८० मध्ये युगात्मा शरद जोशी ने सावध केले.त्यांनी आपल्यासाठी सर्व सुखाचा ,सर्वस्वाचा त्याग करून आयुष्य अर्पण केले.परंतु त्यांचेवर विश्वास न ठेवता आम्ही शेतकरी जाती -धर्मात वाहून गेलो व आमचे लोक प्रतिनिधी आमचा साठी देव चिमण्या ठरल्या .
 

         पोशिंदा ,अन्नपूर्णा ,अन्नदाता नामाभिधान देतो आम्ही , करा हाडाचि काडं ,पिकवा तुम्ही ,

        विकावे कुठें ? कसें ? तें  ठरऊ आम्ही , सीमेवरती पोलीस बसवूं ,तरि तुम्हासच बडवूं   
 

   असे आजच्या बटू वामनाचे स्वरूप आहे .हा बटू वामन ‘अन्न सुरक्षा कायदा’ करतो पण ‘अन्न उत्पादक सुरक्षेचा ’ विचार त्याच्या डोक्यात कधीच येत नाही.
 

       आतातरी आम्ही या बटू वामनाला ओळखून सावध होऊन विशेषतःतरुण शेतकऱ्यांनी संघटीत पणे युगात्मा शरद जोशींनी दिलेल्या चतुरंग शेतीचा वापर करून पुढील वाटचाल केली पाहिजे . आज आपल्याला सह्यांद्री अग्रो प्रो.कंपनी चे संचालक आदरणीय विलासजी शिंदे सारखे अनेक आदर्श व दिशा दर्शक आहेत.तसेच ‘एक हाथ रुमण्यावर तर दुसरी नजर दिल्लीच्या  धोरणावर’ ठेऊन लढा देऊया.तरुणांनी यासाठी  नवीन तंत्रज्ञाचा वापर करून प्रशिक्षित व्हावे, पुढे यावे त्यासाठी स्वताला झोकून द्यावे. उद्याचा सूर्योदय तुमचा आहे .
 

- दिलीप भोयर,

धनोडी,ता.वरुड,जि.अमरावती
(मो.नं.८९९९६७३१४४)

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

गुरुवार, November 16, 2023 - 14:50
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

CongratsCongrats

कृपया प्रवेशिकेचे शीर्षक बदलावे. अनेकदा समान शीर्षक असल्याने गुणतालिकेत गुण नोंदवताना घोळ होत असतो. त्यामुळे शीर्षकात वेगळेपण असावे.

  • Log in or register to post comments
लेखन छान आहे.

समीक्षक

सोमवार, November 20, 2023 - 12:17
Permalink
New

लेखन छान आहे.

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 6570 views

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 10 *
Who's new नवीन सदस्य
  • Rutuja Bane
  • कीर्ती _विजय _लंगडे
  • Madhuri_123
  • Rashin@123
  • sneha

Recent comments ताजे प्रतिसाद

  • तरल आणि काळजाचा ठाव घेणारी रचना
    6 hours 3 minutes ago
  • संवेदनशील आणि रोखठोक आविष्कार
    6 hours 5 minutes ago
  • काळ्या आईवरची निष्ठा
    6 hours 7 minutes ago
  • प्रभावीपणे मांडली आहे.
    6 hours 9 minutes ago
  • अप्रतिम आणि काळजाला भिडणारी रचना!
    1 day 6 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - 2023-24 461
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 194
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 140
किती चाटणार भारतपुत्रा? 136
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 136
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 134
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 134
कापला रेशमाच्या सुताने गळा 131
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 117
किसान क्रांती 53
मातृत्वाचा शृंगाररस 36
गझल 32
दुःख मातीतले.... 30
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 26
असे करावे महिला कवी-लेखिकांच्या पुस्तकाचे समीक्षण! 25
ती 17
तुझ्यापायीच झाली ही दैना 16
दुष्काळ... 16
IT कार्यशाळा - लेखन कसे करावे? - भाग-१५ 16
राजकीय मेंदू करतोय भारतीय शेतीचा घात : कोरोना माहात्म्य ||१३|| 14

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 217,973
माझे फेसबूक स्टेटस-1 180,810
शुभारंभ 134,898
रानमेवा - भूमिका 109,382
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,374
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,104
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,527
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,772
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,573
उद्देश आणि भूमिका 77,432
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,401
विचारपूस 71,686
गणपतीची आरती ॥३५॥ 67,706
सत्कार समारंभ : वर्धा 66,719
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,262
किती चाटणार भारतपुत्रा? 61,183
जात्यावरची गाणी 55,986
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,359
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,033
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,337

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini