नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
जागण्या तैयार नाही झोपले सरकार
सोंग आहे झोपण्याचे आपले सरकार
शेत्कऱ्यांची आर्त नाही ऐकता येणार
मारतांना धोरणातच गावले सरकार
आज कळले मानती का ते असे आभार
चोरट्यांना साथ देण्या धावले सरकार
बुजवणे सोडून येथे पाडती हे भोक
या जहाजा बुडवणारे भासले सरकार
शर्यतीला धावण्याच्या आजही लाचार
पाच वर्षांचे तरीही रांगले सरकार
जाप केला 'धिर' तरी ना भेटले जिवदान
पाहुनी धन धनपतींना पावले सरकार
वृत्त :~आस्त्रवीणी
लगावली :~गालगागा गालगागा गालगागा गाल
प्रतिक्रिया
अप्रतिम धिरज भाऊ!
सोंग आहे झोपण्याचे आपले सरकार!
आस्त्रवीणी वृत्तात तुम्ही आणखी एका अप्रतिम गझलेची भर घातली. अभिनंदन!!
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने